परभणीतील सोनपेठ पोलिस ठाण्यात चौघाजणाविरुध्द अॅट्रोसिटीसह गुन्हा दाखल..!
परभणी/सोनपेठ (Shelgaon Crime) : तालुक्यातील शेळगाव येथील एका मातंग समाजातील महाविद्यालयीन युवकास चौघा जणांनी जाती वाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. ही घटना २५ मार्च रोजी घडली. या (Shelgaon Crime) प्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात चौघा जणााविरुध्द अॅट्रोसिटीसह अन्य कलमाखाली २८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेळगाव येथील रामेश्वर मधूकर उफाडे १७ वर्ष, रा. शेळगाव हा तरुण कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात इयत्ता आकरावी वर्गात शिकत आहे. २४ मार्च रोजी रामेश्वर उफाडे हा वर्गात बसलेला असताना पाठीमागे बसलेल्या श्रीसारंग खरात याने पाठीमागून पेन फेकून मारली. याचा जाब विचारला असता तू मातंग समाजाचा आहेस, शिकतोस कशाला ? बँड वाजव असे म्हणाला. तेव्हा रामेश्वर याने त्याच्या थोबाडीत मारली.
याचाराग मनात धरुन दुसर्या दिवशी २५ मार्च रोजी क्रिकेटच्या मैदानावर रामेश्वर उफाडे यास बोलावून घेतले. यावेळी श्रीसारंग खरात, ओमकार शिंदे, विश्वजीत जाधव, व त्यांच्यासोबतच्या अन्य एकाने रामेश्वर यास बेदम मारहाण केली. तोंडावर बांबू मारल्यामुळे रामेश्वर उफाडे याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी रामेश्वर उफाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघा जणाविरुध्द (Shelgaon Crime) सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याबाबत लाल सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. रामेश्वर उफाडे या मातंग विद्यार्थ्यांवर हल्ला (Shelgaon Crime) करणार्या आरोपीना गुन्हयाचा निकाल लागेपर्यंत जामिन देण्यात येवू नये. ७. रामेश्वर उफाडे याला शासनाने पाच लाख रूपये मदत त्वरीत द्यावी, अशी मागणी कॉ. गणपत भिसे, कॉ. उत्तम गोरे, कॉ. अशोक उबाळे, कॉ. एल. डी. कदम, माऊली साळवे, दिलीप कांबळे, दिलीप उबाळे, विकास गोरे, सिद्धांत भिसे, तथागत झोडपे, संविधान भिसे आदींनी केली आहे.