आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते होणार उद्घाटन
हिंगोलीत प्रथमच गौतमी पाटील यांची उपस्थिती, अभिनेत्री निशाणी बोरूळे, विदिशा म्हस्कर, माधुरी पवार ठरणार मुख्य आकर्षण
हिंगोली (Hingoli Navadurga Mahotsav) : शहरातील हनुमान नगर येथे मागील अनेक वर्षांपासून युवा सेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक राम कदम यांच्या पुढाकारातून कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव चे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा (Hingoli Navadurga Mahotsav) कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समीतीच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजता गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या मैदानावर आज शुक्रवारी रात्री सात वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक राम कदम यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती युवा नेते शाम कदम यांनी दिली.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या शुभहस्ते व युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या उपस्थितीत (Hingoli Navadurga Mahotsav) कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समिती हनुमान नगर आयोजीत रंगारंग कार्यक्रमाचे उद्घाटन 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले जाणार आहे. या दुर्गा महोत्सवात राम कदम मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
तसेच 26 सप्टेंबरला शुक्रवारी आयोजीत कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या सह रंग माझा वेगळा फेम मराठी सिने अभिनेत्री विदिशा म्हसकर, नृत्यांगना मराठी अभिनेत्री माधुरी पवार, मराठी अभिनेत्री निशाणी बोरूळे ह्या उपस्थित राहणार असल्याची माहिती राम कदम यांनी दिली आहे. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आनंद घ्यावा, असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, शाम कदम यांनी केले आहे.