महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार!
मानोरा (Competitive Exam) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी अभ्यासातील सातत्य आधी चांगली गुण असून ध्येयाचा पाठलाग करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आत्मसात करून स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन करावे असे प्रतिपादन मानोरा तहसीलचे तहसीलदार डॉ.संतोष यावलीकर यांनी केले. ते स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला विज्ञान व कै. पांडुरंग ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या (Meritorious Students) सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे, संस्थेचे संचालक ज्ञानदेवराव भोयर, पुरुषोत्तम रोकडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. विविध स्पर्धा परीक्षा जसे की एमपीएससी, प्राध्यापक पात्रता चाचणीसाठी लागणारी सेट परीक्षा, मेडिकल प्रवेशासाठीची नीट परीक्षा आदी परीक्षेतील गुणवंताचा सत्कार सोहळा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून स्पर्धा परीक्षेतील यशवंताच्या कौतुकासह संस्थेचे शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजन मागची भूमिका प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन एस ठाकरे यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल ढवळे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सांस्कृतिक समितीचे संयोजक प्रा. डॉ. अली यांचे सह समिती सदस्य प्रा डॉ. राहुल काजळकर, प्रा. विशाखा पोहरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित!
याप्रसंगी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन कृषी सहाय्यक पदावर निवड झालेल्या श्रीकांत ठाकरे, बीएमसी परीक्षेत निवड मिसबाह पटेल, फॉरेन्सिक लॅब अमरावती येथे निवड झालेल्या असलम पटेल, तसेच वेगवेगळ्या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ओम नंदू राऊत, सृष्टी दत्तात्रय ठाकरे, रोशन राठोड, अंजली गावंडे तसेच नीट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन गवर्नमेंट मेडीकल कॉलेजला नंबर लागलेले सौरव ब्राम्हण, आफ्नान जडियावाला, नीट पीजी परीक्षा उत्तीर्ण महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी गायत्री ढोले तसेच अभिनव क्षेत्रात व कृषी क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या दिवेश गावंडे या गुणवंतांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.