ए.एस.पी.एम.आयुर्वेद महाविद्यालयाचा भव्य पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न
बुलडाणा (Prataprao Jadhav) : जगभरात आयुर्वेदाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आयुर्वेद शास्रात अधिक प्रमाणात अनुसंधान होणे अत्यावश्यक असून हजारो वर्षांपूर्वी निर्मित या शास्राला गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान संस्था, बुलढाणा च्या पदवीदान समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना केले.
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय (ASPM Ayurveda College) , रुग्णालय व अनुसंधान संस्था, बुलडाणाच्या प्रशस्त प्रांगणात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची आयुर्वेदाचार्य पदवी संपादीत केलेल्या पदवीधारकांच्या पदवीदान समारंभाचे भव्य आयोजन दिनांक ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. सदर गौरवशाली समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ सर तर मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) , निमाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन पडघान हे होते.
यावेळी विचारमंचावर संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव जायभाये, सचिव पंजाबराव इलग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा संस्थेचे कोषाध्यक्ष व प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, संस्थेचे सहसचिव ऍड. पराग वाघ, विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ सदस्या व संचालिका डॉ. स्वाती उबरहंडे, संचालक विजय जायभाये, विदयापीठ विद्यार्थी प्रतिनिधी विशाल शिंपले आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात धन्वंतरी पूजन, स्तवन व दिप प्रज्वलनाने झाली. सुमधुर वाणीत संपन्न झालेल्या स्वागतगीतानंतर विदयापीठ गीत सादर करण्यात आले. प्रमुख अतिथिंचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या वतीने करण्यात आला तसेच केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून मानपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव कारण्यात आला यावेळी मानपत्राचे वाचन डॉ. स्वाती उबरहंडे यांनी केले.
समारंभाचे प्रस्ताविक करताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे यांनी संघर्षातून सुरु झालेल्या महाविद्यालयाच्या विकासात्मक वाटचालींवर प्रकाश टाकून विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून संस्थेच्या माध्यमातून राबाविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमाची माहिती दिली तसेच ‘ज्ञानासाठी आत या व सेवेसाठी बाहेर जा’ असे प्रेरणादायी वक्तव्य करून शुभेच्छा प्रदान केल्या. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ यांनी महाविद्यालयाचा नावलौकिक निर्माण करण्यासोबतच स्वकर्तृत्व सिद्ध करा.
तसेच सर्वसामान्यांची सेवा करून समाजात आदर्श निर्माण करावा असे गौरवोदगार आयुर्वेदाचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ काढून सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी महाविद्यालयाच्या वर्ष २०१८-१९ व २०१९-२० प्रवेशित बॅचच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी ना. जाधव (Prataprao Jadhav) याच्याहस्ते आयुष आहार संकल्पनेचे उदघाटन सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण पाटील व डॉ. भागवत वसे यांनी केले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापकवृन्द डॉ. अरुण देशमुख, डॉ. संजय ठोकळ, डॉ. सुनिल नागरे डॉ. वैशाली पेड्डावाड, डॉ.राजीव बुधवत, डॉ.संदिपकुमार नागरे, डॉ. देवयानी खेळकर, डॉ. गणेश देशमुख, डॉ. स्वप्नील धोरण, डॉ. कांचन अंभोरे, डॉ. वर्षा सरसांडे, डॉ.दिपीका पाटील, डॉ. सुजित लहासे डॉ. प्रियंका कोल्हे, डॉ. प्रविणकुमार कपले, डॉ. विष्णु सोनोने, डॉ. राहुल धनवई, डॉ. स्नेहल ईलग, डॉ. विवेक राजपूत, डॉ. शैलेजा मोहरीर, डॉ.विशाल वसतकार डॉ. सोनाली वठारे, डॉ. प्रणाली काळे, डॉ. दिपीका व्यवहारे, डॉ. प्रियंका मोहाळे, डॉ. निकिता आढाव, शिक्षकेत्तर कर्मचारी, सत्कारमूर्ती पदवीधारक, आंतरवासियता प्रशिक्षणार्थी, पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.