सीबीआयने दाखल केला नवीन गुन्हा
नवी दिल्ली (Karti Chidambaram) : माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे खासदार पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि भ्रष्टाचाराशी संबंधित काँग्रेस खासदार (Karti Chidambaram) कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध एक नवीन गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने कार्ती चिदंबरम यांना सेक्वोइया कॅपिटल मॉरिशस, ॲडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड (एएससीपीएल) आणि बसंत हेल्थ केअरसह सह-आरोपी म्हणून नाव दिले आहे.
CBI books son of former finance minister P Chidambaram and Congress MP Karti Chidambaram in fresh corruption case: officials
— Press Trust of India (@PTI_News) January 9, 2025
2008 मध्ये भारतात करमुक्त दारू विक्रीसाठी डियाजियो स्कॉटलंडवर लादलेली बंदी उठवण्यात कथित अनियमिततेप्रकरणी सीबीआयने नवीन गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) प्राथमिक तपासात वसंत हेल्थ केअरच्या माध्यमातून सेक्वोइया कॅपिटल मॉरिशस आणि ॲडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड (एएससीपीएल) सोबत संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले. तपासात असे दिसून आले की, वसंत ग्रुपकडून थेट शेअर्स खरेदी करण्याऐवजी ते ASCPL द्वारे खरेदी केले गेले. जाणून घ्या…काय आहे 16 वर्ष जुने रहस्य
कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांना फायदा व्हावा म्हणून हे केले गेले. बसंत ग्रुपच्या शेअर्सची (Basant Group) वास्तविक किंमत फक्त 30 लाख रुपये असताना कार्ती चिदंबरम यांना 22.50 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
जाणून घ्या…काय आहे 16 वर्ष जुने प्रकरण
- 2008 मध्ये भारतात डियाजियो स्कॉटलंडच्या शुल्कमुक्त दारूच्या विक्रीवरील बंदी बेकायदेशीरपणे टाळण्याच्या आरोपांशी (CBI) सीबीआयची चौकशी जोडलेली आहे.
- जॉनी वॉकर व्हिस्की भारतात आयात करणारी प्रसिद्ध डियाजियो स्कॉटलंड कंपनी 2005मध्ये एका मोठ्या आरोपात अडकली होती.
- आयटीडीसीने डियाजियोला ड्युटी फ्री उत्पादने विकण्यास बंदी घातली होती, या बंदीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याच्या 70% भारतीय बाजारपेठेतील कामकाजावर परिणाम झाला.
- आयटीडीसीने लादलेल्या बंदीला टाळाटाळ करण्यासाठी डियाजियो स्कॉटलंडने (Karti Chidambaram) कार्ती चिदंबरम यांची मदत मागितली होती, असा आरोप सीबीआयने केला आहे.
- या मदतीच्या बदल्यात, ॲडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड (एएसपीएल) ला 15,000 अमेरिकन डॉलर्सची लाच देण्यात आल्याचा आरोप आहे.
- सीबीआयच्या मते, ही लाच डियाजियो स्कॉटलंड आणि एएसपीएल यांच्यातील बनावट कराराच्या स्वरूपात सादर करण्यात आली होती.