हिंगोली (Congress Party) : आज दिं.३० ऑक्टोबर रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी बारा वाजता हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.सुरेश सराफ यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली शहरातील प्रभाग एक ते प्रभाग सतरा यातील इच्छुक उमेदवारांना काॅंग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज देण्यात आले.
यावेळी उमेदवारांचा मिळालेला प्रतिसाद व उत्साह पाहून प्रभागातील उमेदवारांची संख्या वाढत असल्याने, ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज नेल्याने आज फक्त अर्ज वाटप करण्यात आले, व ते दोन दिवसात हिंगोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद उबाळे यांच्याकडे सुपूर्द करावे, त्यानंतर मुलाखती घेण्यात येतील असे जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ यांनी सांगितले.
यावेळी विनायकराव देशमुख, गजाननराव देशमुख पळशीकर, श्यामराव जगताप, बापुराव बांगर, अनिल नेनवानी, विशाल घुगे, माजी नगरसेवीका सौ.आशाताई उबाळे, मुजीब कुरेशी, आरिफ लाला, जुबेर मामु, सौ.शोभाताई मोगले, सुदाम खंदारे, शम्मी पठान, विशाल इंगोले, हारुण पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
Congress Party: हिंगोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इच्छुक उमेदवारांना काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज वाटप!




