पाणी वापरल्यामुळे तब्येत बिघडल्या असून गावातील नागरिक विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल!
परभणी (Contaminated Water) : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाण्यामुळे तब्बल २०० नागरिकांना विषबाधेची लागण (Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील नागरिकांना (Citizens) काही दिवसांपासून अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता.हे पाणी ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) जुन्या व बंद असलेल्या विहिरीतून पुरवले जात असल्याने दूषित झाले असून,अनेकांनी ते पाणी वापरल्यामुळे तब्येत बिघडल्या असून गावातील नागरिक विविध रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची घटना दिनांक 14 ऑक्टोबर रोजी घडली आहे.
डॉक्टर व आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना तातडीची मदत मिळण्यात विलंब!
मिळलेली अधिक माहिती अशी की,ग्रामपंचायत अंतर्गत गावात पाणी पुरवठा करण्यासाठी तीन विंधन विहीर आहेत या पैकी 2 विहिरीवरून गावाला नियमित पाणी पुरवठा करण्यात येत होता मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी पासून एका शेतकऱ्याच्या शेतात पाणी लिकेज असल्यामुळे सोयाबीन काढण्यास अडचण येत असल्यामुळे त्या विहिरीचे पाणी पुरवठा बंद करून मागील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या विहिरीतून गावाला पाणी पुरवठा करण्यात आला मात्र विहिरीतील पाणी दीर्घकाळ साचलेले, शेवाळयुक्त आणि दूषित होते. तरीही जबाबदार अधिकाऱ्यांनी (Officers) त्याची तपासणी न करता गावकऱ्यांना हेच पाणी दिले. परिणामी गावात अतिसार, उलट्या,पोटदुखी,डोकेदुखी यासारख्या तक्रारी झपाट्याने वाढू लागल्या.परिणामी नागरिकांत भीतीचे वातावरणात निर्माण झाले यावेळी गावातील नागरिकांना तत्काळ गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल केले परंतु गावातील आरोग्य उपकेंद्रात केवळ एकच कर्मचारी उपस्थित असून,डॉक्टर व आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना तातडीची मदत मिळण्यात विलंब झाला. यावेळी गंभीर रुग्णांना उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. काही रुग्णांना परभणी जिल्हा रुग्णालयात (Parbhani District Hospital) दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी संजयकुमार पांचाळ, गटविकास अधिकारी सुभाष मानकर तालुका आरोग्य अधिकारी आबासाहेब जाधव यांनी गावात भेट दिली आहे
सध्या गावातील नागरिकांनी दूषित पाण्याचा वापर करूनये गावात वॉटर एटीएम चालू करण्यात आले असून पिण्यास त्याच पाण्याचा वापर करावा शिवाय काही मेडिकल देण्यात आले आहे त्याचा वापर करावा. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी आबासाहेब जाधव यांनी केले आहे.
गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या सरपंच, जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी.
रहीम कोक्कर