परभणी शहरातील ईटलापुर मोहल्ला येथील घटना नानलपेठ पोलिसात नोंद…!
परभणी (Parbhani Crime) : शहरातील रस्त्यावर खेळत असलेल्या लहान मुलांना पाहून दुचाकीचा हॉर्न वाजविल्या नंतर झालेल्या वादात आरोपींनी संगणमत करत जबर मारहाण केली. घरातील साहित्याची नासधूस केली. तसेच महिलांसोबत अश्लिल वर्तन केले. ही (Parbhani Crime) घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ईटलापुर मोहल्ला भागात घडली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीश चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे दुचाकीने जात असताना रस्त्यावर लहान मुलं खेळत होती. त्यामुळे यांनी हॉर्न वाजविला. यावर आरोपीने हॉर्न का वाजवतो, असे म्हणत वाद घातला. (Parbhani Crime) थापडबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी हे घरी गेले असता आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेला फिर्यादीचा भाऊ यालाही लोखंडी पाईपने मारुन गंभीर जखमी केले.
फिर्यादीची आई, बहिण, वहिनीलाही धक्काबुक्की करण्यात आली. (Parbhani Crime) आरोपींनी घरातील साहित्याची नासधूस करत दहा हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी शेख अजहर उर्फ अज्जू, शेख मोईन, अनिस खान उर्फ अन्नु, शेख गौस, मुखीद खान व इतर तीन अनोळखी इसमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनि. कारवार करत आहेत.