परभणीतील गंगाखेडच्या माखणी गावातील घटना!
परभणी (Old Woman) : स्वयपाक करत असताना अचानक लुगड्याने पेट घेतला. आगीत गंभीर 75 वर्षीय वृध्द महिलेला (Old Woman) उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान 29 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वृध्देचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दिपक शिसोदे यांनी खबर दिली आहे. सत्यभामा मारोतराव शिसोदे वय 75 वर्ष, रा. माखणी ता. गंगाखेड, असे मयत वृध्देचे नाव आहे. खबर देणार यांची चुलत आजी सत्यभामा या चुलीवर स्वयपाक करत असताना त्यांच्या लुगड्याने अचानक पेट घेतला आगीमध्ये त्या गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपास पोह. साळवे करत आहेत.
चक्कर येऊन एकाचा मृत्यू!
परभणी : अचानक चक्कर आल्याने एका 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना 29 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास परभणी ते वसमत रोडवर हॉटेल साई पॅराडाईस जवळ घडली. मुंजाजी जोंधळे वय 45 वर्ष, असे मयताचे नाव आहे. नंदुराम जोंधळे यांच्या खबरीवरुन ताडकळस पोलिसात (Tadkalas Police) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. वर्हाडे करत आहेत.