७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
तुमसर (Tumsar Thief Case) : तालुक्यातील पाथरी-कवलेवाडा रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपी जंगलात चोरून आणलेल्या (Tumsar Thief Case) कॉपर केबल वायर कापताना आढळून आल्याने गोबरवाही पोलिसांनी कारवाई करत १० आरोपींना ताब्यात घेऊन घटनास्थळावरून ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोबरवाही ठाण्यातील पोउपनि गिते हे दि.१० सप्टेंबर रोजी आपल्या सहकारी कर्मचार्यांसह पाथरी-कवलेवाडा रस्त्यावर गस्त करीत असताना रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपी जंगलात काही तरुण संशयास्पद स्थितीत दिसून आले. पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला तेव्हा चोरीचा डाव हाणून पाडला. पोलिसांनी शुभम परबते रा. चिखला, रिहान मेश्राम रा.शंकर पिरपरिया, विक्रांत झोडे रा.बोनकट्टा, शुभम टेकाम रा.चिखला, गंगा शेंबरे रा.चिखला, दया ऊर्फ भाग्यवान गहाने रा.चिखला, सुमीत कंगाली रा.चिखला, अजय दरेकर रा.बोनकट्टा, उमेश काळसर्पे रा. हिरापूर, समीर शेख रा.चिखला हे केबलवायर कापताना दिसून आले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता घडलेला प्रकार उघडकीस आला आहे. चोरांनी बालाघाट येथील माईल परिसरात ठेवलेला केबल चोरी करून स्कार्पिओ वाहनाने हिरापूर/हमेशा झुडपी जंगलात घेऊन आले. चोरी केलेला केबलवायरवरील प्लास्टीक कव्हर काढताना पोलिसांनी सर्वही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून घटनास्थळावरून ताब्यांचे बंडल, मोटारसायकल क्र.एम.एच.३१/पी.०५१७, तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ वाहन क्र.एम.एच.३६/एच.०९९९ असा जवळपास ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.