Wardha :- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस(Rain) सुरू आहे. गुरुवारी पावसाने रौद्र रुप धारण केले. दुपारी काही भागाला तडाखा दिल्यानंतर रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. कोसळधार पावसाने काही भागात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतपीक जलमय झाले असून नऊ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. चार मंडळ अतिवृष्टीच्या (heavy rain) काठावर राहिले.
ऑटोतील प्रवासी सुदैवाने बचावले
काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नसली तरीही नदी, नाल्यांना पूर आल्याने लगतच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे भिंत पडून एकाचा मृत्यू (Death) झाला. ऑटोतील दोन जण सुदैवाने वाहून जाताना बचावले. सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत. कपाशी पात्या, फुलांवर आहे. अशा स्थितीत हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. सततच्या तसेच कोसळधार पावसाने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. रात्रीदेखील पाऊस झाला. पावसामुळे नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. नदी, नाल्यांच्या काठावरील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही भागात शेती खरडून निघाली.
थरकाप उडविणारा विजांचा कडकडाट
दुसर्या दिवशी उशिरापर्यंत शेतात पाणी होते. पिके पाण्याखाली आल्याने अनेक ठिकाणी पिकांवर गाळ साचला होता. नाल्याच्या काठावरील शेतांची परिस्थिती तर अधिकच बिकट होती. कपाशी, सोयाबीन तसेच इतरही पिकांचे पावसाने अतोनात नुकसान झाले. पावसामुळे जनजीवनदेखील प्रभावीत झाले.
सोयाबीनचे पीक दिवाळीपूर्वी हाती येते. शेतकर्यांना यातून चार पैसे पदरी पडतील, अशी अपेक्षा होती. पण, विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यात आलेल्या सततच्या जोरदार पावसाने सोयाबीनचे उत्पन्न होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासोबतच सततच्या पावसाने कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे. कपाशीला पात्या, फुले लागलेली आहे. कापसाची बोंडदेखील लागण्यास सुरूवात झालेली आहे. पण, जोरदार पावसामुळे शेतकर्यांच्या(Farmer) स्वप्नांवर पाणी फिरण्याचीच स्थिती निर्माण झालेली आहे.