हिंगोलीत झाले यशस्वी उपचार
हिंगोली (Crackers Eye Injury) : दिपावली पर्वाला १७ आक्टोबर शुक्रवार पासून वसु बारसे ने सुरवात झाली आहे. सगळीकडे दिपावलीचे धुमधाम सुरू झाली आहे. त्यासाठी बच्चे कंपनीकडून बरेच फटाके खरेदी करण्यात आली आहे. सकाळ पासून लहान मुले-मुली फटाके फोडण्यात मग्न असताना हिंगोली तालुक्यातील एका गावात फटाके फोडतात फटाका उडून आल्याने एका पाच वर्षाचा (Crackers Eye Injury) मुलाच्या डोळ्याला दुखापत झाली या मुलावर व्यंकटेश नेत्रालय व फको सेंटर येथे यशस्वी उपचार करण्यात आले.
दिवाळी निमित्ताने बच्चे कंपनी फटाके फोडण्यात मग्न झाली आहे. शुक्रवारी सकाळी हिंगोली तालुक्यातील एका गावात फटाके फोडताना फटाका उडुन एका पाच वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत (Crackers Eye Injury) झाली. मुलाच्या वडीलांनी तातडीने त्याला हिंगोली येथील व्यंकटेश नेत्रालय व फको सेंटर येथे उपचारासाठी त्याला आणल्या नंतर नेत्र तज्ञ डॉ. किशन लखमावार, रेटिना तज्ञ डॉ. प्रतिक लखमावर व नेत्र तज्ञ डॉ. नेहा सचिन बोधगिरे यानी तातडीने डोळ्यातील फटाक्याची पडलेली विषारी दारू सलाइनने धुवून तातडीने औषधोपचार केले. त्यानंतर मुलाला बरे वाटले.
दरम्यान पालकांनी लहान मुलांना फटाके उडविण्यास देऊ नये किंवा फटाके उडवितांना पालकांनी सोबत थांबणे आवश्यक आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे फटाके उपलब्ध आहेत. त्यातून विषारी गॅसेस बाहेर पडतात त्यामुळे खाज येणे, डोळे चुरचुर करणे, डोळे कोरडे होणे असे परिणाम होतात. रोशनाई किंवा आतिषबाजी पाहतांना चांगल्या प्रतीचे गॉगल घालावेत व आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावे असे व्यंकटेश नेत्रालय फेको व रेटिना केअर सेंटरचे जेष्ठ नेत्रतज्ञ डॉ. किशन लखमावार, डॉ. नेहा सचिन बोधगिरे, डॉ. प्रतीक लखमावार यांनी आवाहन केले आहे.