परभणीतील वसमत रोडवर कारवाई; नवा मोंढा पोलिसात गुन्हा!
परभणी (Crime Case) : शहरातील वसमत रोडवर औद्योगिक वसाहत परिसरातील समोरील बाजूला असलेल्या भागात भाड्याच्या घरामध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात होता. या बाबत अनैतिक मानवी व्यापार कक्षाला माहिती मिळाली. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकत पिडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी एका महिलेवर नवा मोंढा पोलिसात (Nava Mondha Police) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपी सोनेत यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या पथकाला वसमत रोडवर एक महिला किरायाच्या घरात वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सदर बाबीची खात्री केली. त्या नंतर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी पिडित महिला आढळून आल्या. त्यांनी सदर महिला ही आर्थिक फायद्यासाठी बोलावून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी मुन्नी शेख नामक महिलेवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
