पोलिसांनाच दिली जेलमध्ये टाकण्याची धमकी!
परभणी (Crime Case) : चौकशीसाठी पोलिसांनी ठाण्यात बोलावलेल्या इसमांनी स्वत:लाच ईजा करुन घेत तुम्हाला जेलमध्ये टाकतो, अशी धमकी पोलिसांना देवून गोंधळ घातला. शासकीय कामात अडथळा केल्याने संबंधित तिघांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार २७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
शासकीय कामात अडथळा केल्याने गुन्हा दाखल!
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड यांनी तक्रार दिली आहे. धार रोड वरील कालव्याजवळ झालेल्या शिवीगाळ व मारहाण प्रकरणात पोलिसांनी संशयीतांना चौकशीसाठी बोलावले. यावेळी संबंधितांनी ठाण्यात पोलिसांसोबत हुज्जत घालत गोंधळ घातला. स्वत:चे डोके भिंतीवर अपटून ईजा करुन घेत तुम्हाला जेलमध्ये टाकतो, अशी धमकी दिली. संबंधितांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी देखील डॉक्टरांसोबत गोंधळ घालत वादविवाद करण्यात आला, धमकी देत शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी विखार खान, शेख अजहर, दानिश फारुकी यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
हॉर्न वाजविण्याचा राग; एकाला मारहाण!
परभणी : दुचाकीचा हॉर्न वाजविल्याचा राग मनात धरत शिवीगाळ करण्यात आली. याची विचारणा केल्यावर मारहाण करण्यात आल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास धार रोडवरील कालव्या जवळ घडली. रवि ठोके याने दिलेल्या तक्रारीवरुन विखार खान, शेख अजहर, दानिश फारुकी, अबरार खान यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 
			 
		

