देहविक्री रॅकेटचा भंडाफोड

अकोल्यात पोलिसांनी हाय-प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला

अकोला येथे पोलिसांनी एका मोठ्या देहविक्री रॅकेटचा भंडाफोड करत परदेशी महिलेसह तिघांना अटक केली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अकोल्यात पोलिसांनी हाय-प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला

अकोला : खदान पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत हाय-प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या कारवाईत तंझानिया देशातील एका परदेशी महिलेसह दोन महिलां आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.


खदान पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार

गोरक्षण मार्गालगतच्या एका उच्चभ्रू वस्तीत असलेल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील सदनिकेत हा अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकत कारवाई केली.
या ठिकाणी उच्चभ्रू ग्राहकांना लक्ष्य करून देहविक्रीचे जाळे चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटमध्ये परदेशी महिलेचा समावेश असल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.


एका परदेशी महिलेसह तिघांना अटक

छापेमारीदरम्यान पोलिसांनी तंझानिया देशातील एका महिलेबरोबरच दोन स्थानिक महिला आणि एका पुरुष आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने देण्याचे आवाहन केले आहे.


परदेशी महिला तंझानियातील; मुंबईत संपर्क

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तंझानियातील ही महिला मुंबईत एका महिला आरोपीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर तिला देहविक्रीसाठी अकोला येथे आणण्यात आले असल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे.


मोठ्या रॅकेटचा संशय; सखोल तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपींकडून अधिक माहिती घेतली जात आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत आणि परदेशी महिलेला भारतात कशा पद्धतीने आणले गेले, याचा सखोल तपास सुरू आहे. या मागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, मनोज केदारे व अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने केली.

संबंधित सामग्री

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा ३०० रुपयांचा दंड; २०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरी

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा ३०० रुपयांचा दंड; २०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरी

२०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरीमुळे मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाने ३०० रुपयांचा दंड ठोठावला.

Sep 24, 2026
रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या; रेकी, चोरी की घातपात? बार्शीटाकळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीती

रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या; रेकी, चोरी की घातपात? बार्शीटाकळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीती

बार्शीटाकळी तालुक्यात रात्री विविध गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या; चोरीच्या रेकीची चर्चा. पोलिसांनी पाहणी केली असून ड्रोनच्या उद्देशाची चौकशी सुरू आहे.

Sep 20, 2026
हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

Sep 18, 2026
शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत अदिती पोहरे उतरणार

शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत अदिती पोहरे उतरणार

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अदिती पोहरे उतरणार. उच्चशिक्षित पार्श्वभूमी, अध्यापनाचा अनुभव आणि राजकीय वारसा ठरणार जमेची बाजू.

Sep 13, 2026