River Linking Project

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

River Linking Project

पातूर तालुका सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी विवरा धरणाचा आग्रह; प्रत्येक गावातून पाच शेतकऱ्यांची समिती स्थापन करण्याची मागणी

पातूर : नदीजोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आमदार नितीनबापू देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी व शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला मिळावा, यासह पातूर तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नदीजोड प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या शेतजमिनीचा महामार्गासाठी जमीन संपादन करताना दिल्या जाणाऱ्या दराप्रमाणे मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी ठाम मागणी आमदार नितीनबापू देशमुख यांनी केली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता प्रकल्पाची कार्यवाही पुढे नेऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

तसेच पातूर तालुका भविष्यात सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. नदीजोड प्रकल्पाचा लाभ पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांचा थेट सहभाग राहावा यासाठी प्रकल्पग्रस्त प्रत्येक गावातून पाच शेतकऱ्यांची समिती स्थापन करून या समितीची जिल्हाधिकारी (कलेक्टर) यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व शेतकरी प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांचा योग्य तो विचार न झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजू नये. अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026