आंतरराज्य फसवणूकी टोळी

खोटी माहिती देऊन फसवणुक करणार्‍या आंतरराज्य टोळीस ठोकल्या बेड्या

Interstate Fraud Gang: हिंगोली पोलिसांनी खोटी माहिती देऊन फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीच्या चार सदस्यांना अटक केली. या टोळीने अनेकांना चुना लावला होता.

खोटी माहिती देऊन फसवणुक करणार्‍या आंतरराज्य टोळीस ठोकल्या बेड्या

Interstate Fraud Gang

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

हिंगोली (Interstate Fraud Gang) : कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांना एका मोबाईलवरून कळमनुरीतील एका महिलेच्या खंडवा येथे रेल्वे रूळावर कटून मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह नेण्याकरीता आईस बॉक्सची आवश्यकता आहे. त्यासाठी ५ हजार रुपयाची मदत करा असे सांगुन जीआरपी रेल्वे स्टेशन खंडवा पोलिस निरीक्षक मनोज कुमार बोलतो, असे सांगितल्याने माणुसकीच्या नात्याने वैभव चौधरी यांनी ५ हजार रुपये पाठविले. परंतु हा (Interstate Fraud Gang) प्रकार बनावट व फसवणुकीचा असल्याने त्यात कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल १६०० किमी अंतराचा प्रवास करून मध्यप्रदेशातून ४ भामट्यांना जेरबंद केले. 

४ एप्रिल रोजी कळमनुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणार्‍याने स्वतःची ओळख 'खंडवा रेल्वे पोलीस निरीक्षक मनोज कुमार' अशी करून दिली. त्याने सांगितले की, 'हिंगोलीतील खुशबू मोहन पाटील या मुलीचा खंडवा येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. मृतदेह पाठवण्यासाठी आईस बॉक्सची गरज असून तिच्या नातेवाईकांकडे पैसे नाहीत, तरी तातडीने ५,००० रुपये पाठवा.' माणुसकीच्या नात्याने पोलिसांनी ऑनलाइन पैसे पाठवले. मात्र, काही वेळाने वसमत ग्रामीण पोलिसांनाही असाच फोन आल्याने संशय बळावला. 

हिंगोली पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली असता, खुशबू पाटील नावाची कोणतीही मुलगी अपघातात दगावली नसल्याचे स्पष्ट झाले. सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केले असता, हे फोन मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील 'जुना' गावातून येत असल्याचे निष्पन्न झाले. हिंगोली पोलिसांनी विशेष पथक तयार करून मध्य प्रदेशात धाड टाकली. तेथून पुढील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये  अमित कमलेश कुर्मी  (३४), विरसींग गोपाल गौंड  (४०), भारत दयाराम कुर्मी (५५), सिताराम भारत कुर्मी (१९)  यांना ताब्यात घेतले आहे.

हे (Interstate Fraud Gang) आरोपी ऑनलाइन माध्यमातून देशभरातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस स्टेशन प्रभारींचे नंबर मिळवत असत. त्यानंतर रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून संबंधित भागातील व्यक्तीच्या मृत्यूची खोटी बातमी देऊन पैशांची मागणी करत असत. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी केली आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

हिरानंदानीतील विकासकाच्या तक्रारीनंतर मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांनी अटक केली. फसवणूक आणि खंडणी प्रकरणात चौकशी सुरू.

Oct 02, 2026