औंढा नागनाथ भीषण अपघात

दोन दुचाकीच्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी 

Aundha Nagnath terrible accident: औंढा नागनाथ ते पिंपळदरी मार्गावर तळणी फाट्याजवळ दोन दुचाकीच्या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले. अपघातात चार नागरिक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल.

दोन दुचाकीच्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी 

Aundha Nagnath terrible accident

औंढा नागनाथ (Aundha Nagnath terrible accident) : औंढा नागनाथ ते पिंपळदरी जाणाऱ्या मार्गावर तळणी फाट्याजवळ दुचाकी क्रमांक एम एच 38 ए एफ 2010 तर दुसरी दुचाकी क्रमांक एमएच 38 एल 507 दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना  4 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. 

गजानन प्रल्हाद चिरमाडे वय 28 वर्ष राहणार राजापूर, पिराजी तुकाराम काळे वय 38 वर्ष राहणार राजापूर, रामराव शंकरराव धनवे वय 45 वर्षे राहणार वाळकी, दीपक देवराव गारुळे वय 24 वर्ष असे या (Aundha Nagnath terrible accident) अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, साह्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे, जमादार वसीम पठाण, शाहेद सय्यद, सुभाष जैताडे, वाहतूक पोलीस वसंत चव्हाण, रावसाहेब देशमुख, यांच्यासह जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने अपघातग्रस्तांसाठी मोफत सुरू असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली यानंतर आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या रुग्णवाहिकेने औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते घटने प्रकरणी अद्याप औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

संबंधित सामग्री

औंढा नागनाथ येथे चारा टंचाई निवारणासाठी आढावा बैठक संपन्न 

औंढा नागनाथ येथे चारा टंचाई निवारणासाठी आढावा बैठक संपन्न 

Aundha Nagnath Fodder Scarcity Relief: आगामी काळातील संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी आणि पशुधनासाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पंचायत समिती, औंढा नागनाथ येथे आज जिल्हा परिषद..

Oct 07, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Oct 02, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026