मनसर भीषण अपघात

मनसरजवळ भीषण अपघात; बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी 

Mansar Terrible Accident: मनसर कांद्री तलाव परिसरात एक दुचाकीस्वार मृत्यूमुखी, तर एक जण गंभीर जखमी झाला. नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या बसने धडक दिली.

मनसरजवळ भीषण अपघात; बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी 

Mansar Terrible Accident

रामटेक (Mansar Terrible Accident) : रामटेक तालुक्यातील मनसर कांद्री तलाव परिसरात काल रात्री भीषण अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, नादिर खान नासीर खान (वय 23, रा. मनसर) हा त्याच्या पल्सर मोटारसायकलवरून त्याचा चुलत भाऊ अनवार जाफर खान याला मागे बसवून कामानिमित्त मनसरहून कांद्री वस्तीच्या दिशेने जात होता. दरम्यान, नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या भरधाव बसने (Mansar Terrible Accident) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीसह खाली पडले. अपघातात नादिर खान याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर अनवार जाफर खान याला डोक्याला व गुप्तांगावर मार लागून तो जखमी झाला आहे.



घटनेची माहिती मिळताच, रामटेक पोलिसांनी (Ramtek Police) घटनास्थळी धाव घेतली. मृत नादिर खान याचा मृतदेह शासकीय रुग्णालय, रामटेक येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. तर जखमी अनवार खान याच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, (Mansar Terrible Accident) अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे, हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Ramtek Police) पोलिसांकडून अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death: कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना

Sep 20, 2026
स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026
बारामतीतील सुपे घाटात एसटी बस पलटी; २५ ते ३० विद्यार्थ्यांचा प्रवास, २ ते ३ जखमी

बारामतीतील सुपे घाटात एसटी बस पलटी; २५ ते ३० विद्यार्थ्यांचा प्रवास, २ ते ३ जखमी

बारामतीतील पाटस-सुपा मार्गावरील सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी झाली. २५ ते ३० विद्यार्थ्यांपैकी २ ते ३ जण किरकोळ जखमी झाले असून, इतर विद्यार्थी सुरक्षित आहेत.

Sep 16, 2026