सीएनजी ऑटो अपघात

'धडक...स्फोट...अन् आगीचा भडका! महामार्गावर सीएनजी ऑटो खाक; चालकाचा मृत्यूच्या दाढेतून बचाव'

CNG Auto Accident: उदगीरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर सीएनजी ऑटो आणि स्विफ्ट डिझायर कारच्या धडकने सीएनजी टाकीचा स्फोट झाला. ऑटो जळून खाक झाला. चालकाने जीववाचवला, अपघातात जीवघेणी नुकसान टळली.

'धडक...स्फोट...अन् आगीचा भडका! महामार्गावर सीएनजी ऑटो खाक; चालकाचा मृत्यूच्या दाढेतून बचाव'

CNG Auto Accident

उदगीर (CNG Auto Accident) : उदगीर-जळकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर शनिवारी (7 जून) दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. नळगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर स्विफ्ट डिझायर कार (एमएच 26 व्ही 3760) आणि सीएनजी ऑटो (एमएच 12 वायएल 4181) यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर ऑटोमधील सीएनजी टाकीचा स्फोट होऊन ऑटोने क्षणार्धात पेट घेतला. काही मिनिटांतच ऑटो पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली.

माहितीनुसार, दोन्ही वाहने उदगीरकडे येत होती. नळगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की, ऑटोमधील सीएनजी टाकीचा स्फोट झाला आणि आगीचे लोळ उसळले. काही क्षणांतच संपूर्ण (CNG Auto Accident) ऑटो ज्वालांच्या विळख्यात सापडला. घटनेवेळी ऑटोमध्ये चालक एकटाच होता. धडकेनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तात्काळ बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. अन्यथा ही दुर्घटना जीवघेणी ठरण्याची शक्यता होती. ऑटो आगीत भस्मसात होत असताना परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बातमी लिहीपर्यत  वाढवणा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

"मृत्यू समोर दिसत असतानाही चालकाने वाचवला जीव"
धडकेनंतर सीएनजी टाकीचा झालेला स्फोट (CNG Auto Accident) आणि त्यानंतर लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकही हादरले. काही सेकंदांचा उशीर झाला असता तर ऑटो चालकाचा जीव धोक्यात आला असता. मात्र प्रसंगावधान राखत त्याने बाहेर पडल्याने मृत्यूच्या दाढेतून त्याचा चमत्कारिक बचाव झाला.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

India captain Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी कर्णधार मिळाली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्मृती मंधानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026