परभणी ( Parbhani Farm Produce Theft) : तालुक्यातील झरी येथे केबल, मोटार, शेतीसाहित्य चोरी करतांना दोन चोरट्यांना शेतकर्यांनी पकडले. इतर चोरटे अॅटोतून पसार होण्यात यशस्वी झाले. ही घटना बुधवार १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. शेतकर्यांनी चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले आहेत.
सध्या खरीब हंगामातील शेतीमशागतीचे काम चालू आहे. यासाठी शेतकर्यांनी साहित्य शेतात आणून ठेवले आहे. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास झरी परिसरातील शेतात कापसाच्या पिकामध्ये आठ जण लपून बसले असल्याचे शेतात काम करणार्या शेतकर्यांच्या लक्षात आले. (Parbhani Farm Produce Theft) त्यांनी संबंधितांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहा जण अॅटो घेऊन पसार झाले. तर दोघांना शेतकर्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ केबल तोडण्याची पकड, चोरी करण्याचे साहित्य मिळून आले. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. सपोनि.आडके, पोउपनि मोहिते, बीटजमादार कनाके, शंकर हाके यांच्या स्वाधीन चोरट्यांना करण्यात आले.
परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी
Parbhani Farm Produce Theft: तालुक्यातील झरी येथे केबल, मोटार, शेतीसाहित्य चोरी करतांना दोन चोरट्यांना शेतकर्यांनी पकडले. इतर चोरटे अॅटोतून पसार होण्यात यशस्वी झाले.
Parbhani Farm Produce Theft
संबंधित सामग्री
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल
पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी
नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.