हिंगोली (Hingoli gambling raid) : शहरातील संभाजी विद्या मंदिर शाळेसमोर सुरु असलेल्या झन्नामन्ना जुगारावर हिंगोली शहर पोलिसांनी छापा मारून ९ जुगार्यावर गुन्हा दाखल केला. हिंगोली शहरातील संभाजी विद्या मंदिर शाळेसमोर झन्नामन्ना जुगार सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकुर यांना मिळाल्याने त्यांनी १४ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास पोलिस पथकाला छापा मारण्याकरीता रवाना केले. यावेळी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात घटनास्थळी नगदी २५८० रुपये, मोबाईल, मोटर सायकल असा एकूण १ लाख २४ हजार ५८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शेख आवेश शेख जमिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख सादीक शेख जलाल रा. हरण चौक हिंगोली, शेख साजीद शेख सत्तार,शेख मुजाहिद शेख मदार, शेख आमीर शेख अकबर, रिहान शेख अमजद रा. मस्तानशहा नगर हिंगोली, शेख कलीम शेख जाफर रा. परभणी, सुजल हिरालाल श्रीनिवास, सारीम खान युसूफखान पठाण रा. पेन्शनपुरा हिंगोली या ९ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के हे करीत आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज वाघमारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के , शेख अमजद, शेख आवेज, बाबासाहेब कांबळे, मयुर वायकुळे, गोपीनाथ घुगे, दिलीप घुगे यांनी कामगिरीत सहभाग नोंदविला.