हिंगोली ग्रामीण पोलिस

वाढदिवसाला डीजे लावणे पडले महागात; हिंगोली ग्रामीण पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

Hingoli Rural Police: तालुक्यातील राहोली खुर्द येथे वाढदिवसा निमित्त सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे डीजे लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा..

वाढदिवसाला डीजे लावणे पडले महागात; हिंगोली ग्रामीण पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

Hingoli Rural Police

 

हिंगोली तालुक्यातील राहोली खुर्द येथील घटना

हिंगोली (Hingoli Rural Police) : तालुक्यातील राहोली खुर्द येथे वाढदिवसा निमित्त सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे डीजे लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाणे अंमलदार यांनी दिलेल्या माहिती दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता राहोली खुर्द येथील मारोती मंदिराच्या पाठीमागे एमआयडीसी कडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर ही घटना घडली.

आरोपी गोपाल विठ्ठल घरबुडवे, आशिष केशव गरड, दोघे रा. राहोली खुर्द ता.जि. हिंगोली आणि दीपक प्रल्हाद क-हाळे, रा. क-हाळे डीग्रस यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त सार्वजनिक रोडवर बकासूर डीजे क्र. MH 26 ED 0255 व देवा नावाचा डीजे क्रमांक MH 20 EL 4381 असे रोडवर लावून रहदारीस अडथळा निर्माण केला. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे करून जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांचे मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) जमाव बंदीचे आदेश असतांना लोकांना जमवून सार्वजनिक उपद्रव केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी राहुली खुर्द येथील पोलीस पाटील स्वप्नील किसन लोनकर  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. २९ सप्टेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार असलम गारवे  करीत आहेत.

टैग्स: Hingoli Rural Police

संबंधित सामग्री

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोलीच्या ईसापूर रमणा येथे ५० वर्षीय शेतकरी विठ्ठल वाढवे यांची आत्महत्या; नापिकी, दुष्काळ, कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता असल्याची माहिती.

Sep 26, 2026
हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
सीआयडीची बतावणी करून शिक्षकाच्या काढून घेतल्या तीन सोन्याच्या अंगठ्या

सीआयडीची बतावणी करून शिक्षकाच्या काढून घेतल्या तीन सोन्याच्या अंगठ्या

Hingoli Rural Police: लाख (मेथा) येथील शिक्षकाची दुचाकी थांबवून दोन भामट्यांनी तीन लाख रुपयाच्या सोन्याच्या अंगठ्या सीआयडी असल्याची बतावणी करून लांबविल्याची घटना घडल्याने हिंगोली

Sep 08, 2026
आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

Hingoli Rural Police: समोर आतंकवादी फिरत  असल्याचे  सांगून त्यांच्या  जवळील सोन्याची अंगठी  काढण्यास सांगून रुमालामध्ये ठेवल्याचे भासून सोळंके यांच्या गाडीच्या डिक्कित ठेवून निघून गेले.

Aug 04, 2026