अवैध सागवान लाकड वाहतूक

निकतवाडा-अंबेला मार्गावर सागवान लाकडांची अवैध वाहतूक उधळली; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal Transport Teak Wood: निकतवाडा-अंबेला मार्गावर वन कर्मचारी अवैध सागवान लाकडाच्या वाहतूकावर पडल्यानंतर जप्त करण्यात आले 15 लाखांचा मुद्देमाल. 8 नग ओंडके जप्त झाले आणि दोन आरोपी पकडले

निकतवाडा-अंबेला मार्गावर सागवान लाकडांची अवैध वाहतूक उधळली; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal Transport Teak Wood

घोट (Illegal Transport Teak Wood) : आलापल्ली वनविभागांतर्गत घोट वनपरिक्षेत्राच्या हद्दीत वन विभागाने मोठी कारवाई करत सागवान लाकडांच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 3 जून 2026 रोजी पहाटे निकतवाडा, अंबेला मार्गावर नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली असता अवैध सागवान वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले.वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबविल्यानंतर वाहनातील मागील बाजूस बसलेले तीन जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

मात्र वाहन चालक आकाश विनोद यादव व सौरभ सिताराम प्रधान यांना ताब्यात घेण्यात आले. (Illegal Transport Teak Wood) तपासणीदरम्यान वाहनातून सागवान प्रजातीचे 8 नग ओंडके (1.339 घनमीटर) जप्त करण्यात आले. जप्त मालाची किंमत सुमारे 1 लाख 57 हजार 623 रुपये असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.

याशिवाय टाटा कंपनीचे वाहन क्रमांक MH-40-CD-4414, एक ग्रीन नेट व दोन मोबाईलसह एकूण अंदाजे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध वनगुन्हा नोंदवून त्यांना प्रथम श्रेणी न्यायालय, चामोर्शी येथे हजर करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक श्रीमती दिपाली तलमले, प्रकल्प निष्कासन अधिकारी मोहम्मद आझाद आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. वाडीघरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक बी. डी. साबळे तसेच वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

वन विभागाच्या या (Illegal Transport Teak Wood) धडक कारवाईमुळे अवैध वृक्षतोड व अवैध वनोपज व्यापार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे. तसेच अवैध वृक्षतोड, वन्यजीव शिकार किंवा अन्य वनगुन्ह्यांची माहिती नागरिकांनी तत्काळ वन अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

धान कोंड्याच्या पोत्यांआड सागवान तस्करीचा पर्दाफाश; ५० ते ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

धान कोंड्याच्या पोत्यांआड सागवान तस्करीचा पर्दाफाश; ५० ते ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

Etapalli Teak Smuggling: एटापल्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली उपवन क्षेत्रात वन विभागाने सागवान तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई करत सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Aug 02, 2026
पळसगाव येथे वनविभागाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा अवैध सागवान साठा जप्त

पळसगाव येथे वनविभागाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा अवैध सागवान साठा जप्त

Palasgaon Forest Action: गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाने मौजा पळसगाव येथे एका घराबाहेर व घरात सुरू असलेल्या अवैध सागवान चिरान व्यवसायावर छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Jun 30, 2026
सागवान लाकडाची अवैध कटाई  करणार्‍या  तिन व्यक्तीवर वनविभागाची कारवाई

सागवान लाकडाची अवैध कटाई  करणार्‍या  तिन व्यक्तीवर वनविभागाची कारवाई

अवैध रित्या बिजा व सागवान लाकडाची कटाई करताना तिन व्यक्तींना अटक केली आहे.

Mar 31, 2026