कळमनुरी (Illegal Liquor Transporting) : स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीच्या पथकाने अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई करत १३ बॉक्स देशी दारूसह ५ लाख ५७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली होती.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कळमनुरी पोलीस स्टेशन हद्दीत मालेगाव–पुसद मार्गावर संशयित कार थांबवून झडती घेतली असता कारमध्ये अवैधपणे देशी दारूचे १३ बॉक्स वाहतूक करताना आढळून आले. या (Illegal Liquor Transporting) प्रकरणी करण राजू व्हडगीर (रा. अकोला बायपास, हिंगोली) व संजय मनोहर कुरील (रा. खुशाल नगर, हिंगोली) यांना कारसह ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५,५७,२४० रुपये इतकी आहे.
याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, प्र. उपअधीक्षक मयूर रसाळ व स्थागुशा मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, हरिभाऊ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, साईनाथ कंठे, नरेंद्र साळवे, शिवाजी जालमिरे यांच्या पथकाने केली.
अवैध देशी दारू वाहतूक करणारी कार पकडली; १३ बॉक्ससह ५.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Illegal Liquor Transporting: हिंगोलीच्या पोलिसांनी कळमनुरीत देशी दारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई केली. १३ बॉक्स दारूसह ५.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना ताब्यात घेतले.
Illegal Liquor Transporting
संबंधित सामग्री
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर
Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग
Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार
Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल