One Sided Love

सावंतपुरात एकतर्फी प्रेमाचा आरोप; तरुणीचा मृत्यू, आरोपी अंकुर सुतारला अटक

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे एकतर्फी प्रेमाच्या कथित त्रासातून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना गुरुवारी घडली.

सावंतपुरात एकतर्फी प्रेमाचा आरोप; तरुणीचा मृत्यू, आरोपी अंकुर सुतारला अटक

One Sided Love

ऋतुजा हलस्कर हिच्यावर फोन आणि मेसेजद्वारे प्रेमसंबंधासाठी दबाव टाकल्याचा आरोप; पलूस पोलिसांकडून तपास सुरू

पलूस : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे एकतर्फी प्रेमाच्या कथित त्रासातून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना गुरुवारी घडली. ऋतुजा हलस्कर असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून अंकुर बबन सुतार याच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अंकुर सुतार याला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ऋतुजा हलस्कर आणि अंकुर सुतार हे सावंतपूर येथील एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते. शेजारी असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये परिचय आणि ये-जा होती. याच ओळखीचा फायदा घेत अंकुर ऋतुजावर एकतर्फी प्रेम करू लागल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे.

ऋतुजा पलूस येथील शासकीय आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तर अंकुर सुतार हा कोल्हापूर येथील एका ज्वेलरी दुकानात काम करत असल्याची माहिती आहे. ऋतुजाने प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने मागील १५ दिवसांपासून अंकुरकडून तिला वारंवार फोन तसेच संदेश पाठवले जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

प्रेमसंबंधासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर,’ अशा आशयाचे संदेश पाठवून ऋतुजाला मानसिक त्रास दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

सततचे फोन, संदेश आणि कथित मानसिक त्रास यामुळे ऋतुजाने गुरुवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. तिच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, सावंतपूरसह पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, ऋतुजाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून अंकुर बबन सुतार याच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासाच्या अनुषंगाने फोन कॉल, संदेश आणि अन्य उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026