विवाहिता आत्महत्या प्रकरण

परभणीत त्या विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा...!

Matrimonial suicide case: लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर विवाहितेला हुंड्यासाठी त्रास दिला . याच त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पोखर्णी येथे घडली

परभणीत त्या विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा...!

Matrimonial suicide case

 

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; ही प्रथा कधी बंद होणार
पोखर्णी नृ. येथे विवाहितेने घेतला होता गळफास...?

परभणी (Matrimonial suicide case) : दैठणा येथे लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर विवाहितेला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४  जुलै रोजी पोखर्णी येथे घडली होती. या प्रकरणात विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या मंडळीवर ६ जुलै रोजी हुंडा बंदी अधिनियम, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दैठणा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

बशीर जलाल अहेमद कुरेशी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलगी अर्शिया हिचे लग्न पोखर्णी येथील युवकासोबत झाले होते. (Matrimonial suicide case) लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. व्यवसायासाठी वारंवार पैशांची मागणी केली होत होती. मुलीला त्रास होऊ नये, यासाठी थोडेथोडे करत दहा ते बारा लाख रुपये सासरच्या मंडळींना देण्यात आले. तरी देखील त्रास कमी झाला नाही.

तुझ्या वडिलांकडून १ लाख ६० हजार रुपये हुंडा घेऊन ये म्हणत विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आला. याच (Matrimonial suicide case) छळाला कंटाळून अर्शिया हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दस्तगीर रसूल कुरेशी, जिलानी रसूल कुरेशी, महेबुब रसूल कुरेशी, सुमय्या जिलानी कुरेशी, रिजवाना महेबुब कुरेशी यांच्यावर दैठणा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

Married Women Harassment: २१ वर्षाच्या विवाहित महिला तुझा आंघोळ करताना उघडे फोटो माझ्या मोबाईलसोबत धमकी देत निघाल्याच्या आरोपावर पळून गेल्याबद्दल पोलिसांनी आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Aug 04, 2026
विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाकडून अंतरिम संरक्षण नाही, 23 जुलैपूर्वी अटकेची शक्यता

विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाकडून अंतरिम संरक्षण नाही, 23 जुलैपूर्वी अटकेची शक्यता

शिवसेना (ठाकरे गट)चे माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधातील प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Jul 15, 2026
पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा छळ

पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा छळ

wife Harassment case: लग्नानंतर पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासरे, दोन नणंद व दोन नंदव्या अशा सहा जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Jul 05, 2026
२१ वर्षीय पूजाचा मृत्यूमागे छळाचा संशय? नवविवाहितेच्या प्रकरणात सासरच्या मंडळींवर गुन्हा

२१ वर्षीय पूजाचा मृत्यूमागे छळाचा संशय? नवविवाहितेच्या प्रकरणात सासरच्या मंडळींवर गुन्हा

गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात एका २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.

Jun 04, 2026
अकोला हादरलं! गजानन नगरात विवाहितेची आत्महत्या;

अकोला हादरलं! गजानन नगरात विवाहितेची आत्महत्या;

अकोला शहरातील गजानन नगरमध्ये विवाहितेने आत्महत्या केली. हुंड्यासाठी छळाचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर केला आहे.

Apr 12, 2026