Vinayak Raut

विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाकडून अंतरिम संरक्षण नाही, 23 जुलैपूर्वी अटकेची शक्यता

शिवसेना (ठाकरे गट)चे माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधातील प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाकडून अंतरिम संरक्षण नाही, 23 जुलैपूर्वी अटकेची शक्यता

Vinayak Raut

सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल; अटकपूर्व जामीन अर्जावर मुख्य सुनावणी 23 जुलैला

शिवसेना (ठाकरे गट)चे माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधातील प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे दाखल गुन्ह्यात विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुख्य सुनावणी 23 जुलै रोजी निश्चित करण्यात आली असून, तोपर्यंत न्यायालयाने कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे.

अंतरिम दिलासा न मिळाल्यामुळे तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना 23 जुलैपूर्वी विनायक राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटकेला सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

गिरिजा राऊत यांनी पती गितेश राऊत, सासरे विनायक राऊत आणि सासरच्या इतर सदस्यांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू आहे. माध्यमांशी संवाद साधताना गिरिजा राऊत यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून न्याय मिळावा, अशी मागणी केली होती.

या प्रकरणात विनायक राऊत यांच्यासह एकूण पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने या अर्जावर अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. त्यामुळे तपास यंत्रणांना आवश्यकतेनुसार संबंधितांची चौकशी करण्याचा अधिकार कायम राहणार आहे. मुख्य जामीन अर्जावरची सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे.

गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीत पती गितेश विनायक राऊत, सासरे विनायक राऊत, शामल विनायक राऊत, सुरेखा सरफरे आणि राजेश सरफरे या पाच जणांची नावे नमूद केली आहेत. या सर्वांविरोधात दाखल प्रकरणात न्यायालयाने तत्काळ दिलासा दिलेला नाही.

तक्रारीत गिरिजा राऊत यांनी संततीप्राप्तीसाठी सासरच्या मंडळींकडून अमानुष छळ झाल्याचा आरोप केला आहे. भोंदूबाबांच्या सांगण्यावरून विविध अघोरी प्रकार करण्यात आले, वारंवार गोमूत्र पिण्यास भाग पाडले, तसेच डोक्यावरील केस काढण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचे आरोपही त्यांनी केले आहेत. या सर्व आरोपांची चौकशी पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026