परभणी अपघाती मृत्यू

परभणीत बुलेट - थारच्या धडकेत एकाचा मृत्यू

Parbhani Accidental Death: परभणीत नांदेड रोडवरील ३१ जुलैच्या शुक्रवारी एक सध्या मृत असलेल्या संतोष बालाजी सावळे याला दुचाकी थार वाहनातून पाठीमागून बुलेटची धडक झाली.

परभणीत बुलेट - थारच्या धडकेत एकाचा मृत्यू

Parbhani Accidental Death

 

नांदेड - पूर्णा रोडवरील गौर शिवारातील घटना
पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीसात गुन्हा दाखल

पूर्णा (Parbhani Accidental Death) : बुलेट वरुन जाणार्‍या एका २८ वर्षीय तरुणाला विना नंबरच्या थार वाहनाने पाठीमागून जोरदार धडक देऊन त्याच्या बुलेटसह फरफटत नेल्याची धक्कादायक घटना पुर्णा-नांदेड रोडवरील गौर शिवारात शुक्रवार ३१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी चुडावा पोलीसांनी घटनास्थळावरुन एकाला पाठलाग करून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष बालाजी सावळे (वय २८) रा.गौर ता.पुर्णा जि.परभणी असे घटनेत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरील तरुण हा शुक्रवार ३१ जुलै रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास त्याच्या बुलेट (एम.एच-२२-१११३) या दुचाकी वरून पूर्णेच्या दिशेने जात होता. (Parbhani Accidental Death) पुर्णा-नांदेड रस्त्यावरील नॉव्हेल्टी बार अँड रेस्टॉरंटजवळ नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या थार वाहनाने त्याच्या बुलेटला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. काही नागरिकांनी त्याला उचलून नांदेड येथे उपचारासाठी हलवले परंतु तो मयत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, सपोनि सुशांत किनगे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी धाव घेऊन पाहणी केली.  दरम्यान, याच वेळी चुडावा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पो.कॉ. चंद्रमुनी हानवते हे पुर्णा-नांदेड रस्त्यावरुन चुडावा कडे जात असताना त्यांनी हा प्रकार पहाताच संबंधित थारला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहनातील दोघे वाहन सोडून पळून जात होते. त्यापैकी सुधिर पारवे नामक इसमाला हानवते यांनी पाठलाग करून ताब्यात घेत जेरबंद केले आहे.  

दरम्यान मयत तरुणाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संतोष सावळे याचे काही महिन्यांपूर्वी गावातील काही तरुणांशी हाणामारी झाली असल्याचे सांगितले. या घटनेत गुन्हा दाखल केल्याने या गुन्ह्याचा राग मनात धरून काही जणांनी संतोष यास वाहनाने चिरडून जीवे मारण्याचा कट रचल्याच्या  कारणावरुन चुडावा पोलिसांत चौदा जणांविरुध्द गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

National Highway Accident: १ ऑगस्ट रोजी पानकनेरगाव येथे दोन तरुणांचा (सुजित बांगर व नितीन बांगर) राष्ट्रीय महामार्गावर होऊन मृत्यू झाला. अपघातमुळे शोकाची कळा गावात पसरली,

Aug 02, 2026
परभणीत रस्त्यातील दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

परभणीत रस्त्यातील दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

Parbhani Accidental Death: 38 वर्षीय परिक्षित लहाणे एक दुचाकीवर चालत असताना परभणी-गंगाखेड रोडवर अपघात झाला आणि मृत होऊन गेला. घटना सायंकाळी घडली,

Jul 28, 2026
कळमनुरी गोळीबार प्रकरण: अकरा आरोपींना न्यायालयाची तीन दिवसांची पोलीस कोठडी

कळमनुरी गोळीबार प्रकरण: अकरा आरोपींना न्यायालयाची तीन दिवसांची पोलीस कोठडी

Kalamnuri Firing Case: थरारक गोळीबार प्रकरणातील तपासाला वेग आला असून, अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना  न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Jul 22, 2026
बुलेटची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू, एक गंभीर

बुलेटची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू, एक गंभीर

Bullet Bike Accident: १३ जुलै सायंकाळी पाथरीच्या तालुक्यातील बुलेट चालकाने दुसऱ्याचे दुचाकीवर धडक दिली. अपघातामुळा एका दुचाकीवर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि गम्भीर जखम झाली.

Jul 14, 2026
परभणीतील गंगाखेडातील रस्त्यावरील भेगांनी घेतला तरुणाचा बळी...?

परभणीतील गंगाखेडातील रस्त्यावरील भेगांनी घेतला तरुणाचा बळी...?

Gangakhed Youth Death: बुधवारी रात्री परभणीतील गंगाखेडपासून जवळच दुचाकीच्या चाकांचे अडकलेले अनियंत्रित वाहन मृत्यू होऊ शकते जखमांना गंभीर असल्याने त्याचे उपचार पाठविले गेले होते.

Jul 10, 2026