परभणी गांजा जप्त

पोलिसांचा घरावर छापा;दिड किलो गांजा जप्त

Parbhani ganja seized: परभणी शहरातील लोहगाव रोडवर मध्यरात्री एका घरावर पोलिसने छापा टाकला. छाप्यात दिड किलो गांजा आणि १ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

पोलिसांचा घरावर छापा;दिड किलो गांजा जप्त

Parbhani ganja seized

 

परभणीतील लोहगाव रोडवर कारवाई; कोतवाली पोलिसात गुन्हा

परभणी (Parbhani ganja seized) : शहरातील लोहगाव रोड परिसरात पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शुक्रवार २९ मे च्या मध्यरात्री एका घरावर छापा टाकला. या कारवाईत घरातून दिड किलो गांजा आणि १ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. सदर प्रकरणी आरोपीवर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोउपनि. संदीप शिंदे, अर्जून टरके, पोलीस अंमलदार सय्यद इरशाद, सुर्यकांत ताटीकोंडलवार, यशवंत वाघमारे, गोविंद चुडावकर, अस्लम शेख, लिंबाजी वाव्हुळे यांचे पथक शहरात अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला लोहगाव रोड साखला प्लॉट परिसरात एका घरात पिराजी मारोती ढेपे हा इसम गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पथकाने सरुबाई मल्हारी गुंठे यांच्या घराची झडती घेतली. यावेळी पिराजी ढेपे हा गांजाच्या पुड्या तयार करताना दिसून आला. त्याच्या जवळून दिड किलो गांजा आणि रोकड जप्त (Parbhani ganja seized) करण्यात आली. या प्रकरणी पिराजी ढेपे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

Giramwadi Gambling Raid: तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त

Sep 01, 2026
कोटगुलमध्ये नवी पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र?

कोटगुलमध्ये नवी पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र?

Kotgul illegal business: एका बाजूने कोटगुल परिसरातील युवक आदिवासी विभागात उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून लागत आहेत, तर दुसऱ्या बाजूने याच परिसरातील युवकांना अवैध धंद्यात

Aug 30, 2026
परभणीत चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजाराचा गुटखा जप्त

परभणीत चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजाराचा गुटखा जप्त

Parbhani Gutkha Seizure: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालम पोलीस ठाणे हद्दित कोळवाडी गावाजवळ केलेल्या कारवाईत एका चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

Aug 30, 2026
हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५०) यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

Aug 29, 2026