रिसोड पोलिस कॉम्बिंग ऑपरेशन

रिसोड पोलिसांची विशेष कामगिरी; ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मध्ये शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक

Risod Police Combing Operation: रिसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच यापूर्वी उघडकीस

रिसोड पोलिसांची विशेष कामगिरी; ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मध्ये शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक

Risod Police Combing Operation

 

चार आरोपी ताब्यात; ४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दोन गुन्हे उघडकीस, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

रिसोड (Risod Police Combing Operation) : रिसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच यापूर्वी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी रिसोड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३.३० ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाकाबंदी व ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या कारवाईत शेती साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून तब्बल ४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रिसोड पोलीस (Risod Police Combing Operation) ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच विविध ठिकाणच्या पारधी बेड्यांची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी मौजे बिबखेडा व मोठेगाव परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयितांची धरपकड करण्यात आली.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खालील चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. गोविंदा मनोहर भोसले (वय ३२), रा. बिबखेडा, ता. रिसोड, जि. वाशीम,राजू मनोहर भोसले (वय २८), रा. बिबखेडा, ता. रिसोड, जि. वाशीम, विजय मनोहर भोसले (वय २७), रा. बिबखेडा, ता. रिसोड, जि. वाशीम, विशाल भारत भोसले (वय २९), ह.मु. बिबखेडा, ता. रिसोड, जि. वाशीम

४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली वाहने, शेती साहित्य तसेच चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारी विविध औजारे असा एकूण ४,४५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ५ मोटारसायकली, ३ पाण्याचे मोटारपंप, पाईप व विविध इलेक्ट्रिकल साहित्य, कटर, लोखंडी हातोडी, लोखंडी टॉमी, वायर कापण्याचे कटर, लोखंडी कत्ता तसेच ३ मोबाईल फोन यांचा समावेश आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारपंप, पाइप व विद्युत साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकशीत दोन गुन्हे उघडकीस

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांच्या सहभागातून रिसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.दरम्यान, चोरीच्या घटनांमध्ये आरोपींसोबत आणखी काही जण सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.चोरीच्या गुन्ह्यांमध्ये संजय किशोर पवार (वय २८, रा. बिबखेडा), संजय बबन भोसले (वय ३०, रा. मोठेगाव) आणि प्रदीप उर्फ खापर्या सावजी पवार (वय ४०, रा. मोठेगाव) यांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. हे आरोपी सध्या फरार असून रिसोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

तसेच चोरीचा मोटारपंप विकत घेणारा नागेश भगवान वाघ, रा. मोठेगाव याच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर, गणेश सूर्यवंशी, सहायक फौजदार घुले, पोलीस कॉन्स्टेबल विनोद घनवट, रवी अडागळे, परमेश्वर भोणे, सतीश दिंडे, रुपेश मस्के, प्रविण गोपनारायण, देविदास काळबांडे, संतोष धोत्रे, आदिनाथ इडोळे आणि ज्ञानेश्वर पारवे यांनी सहभाग घेतला.

रिसोड पोलिसांच्या (Risod Police Combing Operation) या धडक कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त व तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, उर्वरित फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

रिसोडमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाचा दणका!

रिसोडमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाचा दणका!

रिसोड शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानपट्टी व किराणा दुकानांवर पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई केली.

Aug 08, 2026
जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन थंडावल्याने गुन्हेगारांनी काढले वर तोंड

जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन थंडावल्याने गुन्हेगारांनी काढले वर तोंड

Hingoli Combing Operation: प्रमुख कारण म्हणजे पोलिसांकडून घेतले जाणारे कोंबिंग ऑपरेशन जवळपास थांबल्याने गुन्हेगार बिनधास्त झाल्याची चर्चा आता सर्वत्र आहे.

Aug 06, 2026
रिसोड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

रिसोड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

रिसोड तालुक्यातील लेहणी फाटा येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात रिसोड पोलिसांच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला मोठे यश आले

Jul 11, 2026
लातूर पोलिसांचे ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन'!

लातूर पोलिसांचे ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन'!

Latur Police Mission: लातूर पोलिसांनी २४ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून ६ जणांवर शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई,

Apr 25, 2026