DB Squad

रिसोड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

रिसोड तालुक्यातील लेहणी फाटा येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात रिसोड पोलिसांच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला मोठे यश आले

रिसोड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

रिसोड : रिसोड तालुक्यातील लेहणी फाटा येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात रिसोड पोलिसांच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला मोठे यश आले असून, गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांतच आरोपीला अटक करून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

रिसोड तालुक्यातील गौंढाळा येथील रहिवासी शेषराव गुडदे (वय ६७) यांची ‘एच एफ डीलक्स’ मोटारसायकल (क्रमांक MH 37 N 3882) २१ जून २०२६ रोजी लेहणी फाटा येथून चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी रिसोड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ६३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी. पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले. पथकाने परिसरात आपले गोपनीय बातमीदार सक्रिय केले. दरम्यान, बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ऋतिक राजू डोंगरे (वय २२, रा. पेनबोरी, ता. रिसोड, जि. वाशिम) या संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली.

तपासादरम्यान आरोपीकडून चोरीला गेलेली १५,००० रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.

सदर यशस्वी कारवाई वाशिमचे पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील (भापोसे), अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपासात पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस हवालदार सुरेश येरमुले, आशिष पाठक, पोलीस अंमलदार रूपेश पडघान, परमेश्वर भोणे, राजेश गांगवे आणि रवी अडागळे यांनी मोलाची भूमिका बजावली.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; लोहगडावर रचलेला कट पोलिस तपासात उघड

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; लोहगडावर रचलेला कट पोलिस तपासात उघड

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल. लोहगडाची रेकी, बनावट Instagram अकाऊंट आणि अन्य बाबी तपासात समोर

Sep 20, 2026
रात्री भेटायला गेली... परतलीच नाही; दोन दिवसांनी शेतात आढळला मृतदेह; दिल्लीतील क्रूर हत्याकांड

रात्री भेटायला गेली... परतलीच नाही; दोन दिवसांनी शेतात आढळला मृतदेह; दिल्लीतील क्रूर हत्याकांड

दिल्लीतील स्वरूप नगरमध्ये १६ वर्षीय मुलीची हत्या. ५० हून अधिक CCTV तपासल्यानंतर १९ वर्षीय तरुणाला अटक, तीन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात.

Sep 18, 2026
रिसोड पोलिसांची विशेष कामगिरी; ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मध्ये शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक

रिसोड पोलिसांची विशेष कामगिरी; ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मध्ये शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक

Risod Police Combing Operation: रिसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच यापूर्वी उघडकीस

Sep 08, 2026
अवैध धंद्यांविरोधात भाजप आक्रमक; पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन

अवैध धंद्यांविरोधात भाजप आक्रमक; पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन

रिसोड तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sep 02, 2026