उदगीर दगडफेक घटना

उदगीरमधील मुसानगर परिसरात दगडफेक; शासकीय कामात अडथळा, ४७ आरोपींवर गुन्हा दाखल

Udgir Stone Pelting Case: उदगीरमध्ये दगडफेकीच्या गंभीर घटनेत शासकीय जीपचे नुकसान झाले व पोलीस कर्मचारी जखमी झाला. ४७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीरमधील मुसानगर परिसरात दगडफेक; शासकीय कामात अडथळा, ४७ आरोपींवर गुन्हा दाखल

Udgir Stone Pelting Case

एक पोलीस कर्मचारी जखमी; पोलीस वाहनाचे नुकसान

उदगीर (Udgir Stone Pelting Case) : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील मुसानगर परिसरात शनिवारी दि.४ एप्रिल रोज शनिवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये झालेल्या तणावातून दगडफेकीची गंभीर घटना घडली. या घटनेत शासकीय जीपचे मोठे नुकसान झाले असून एका पोलिस कर्मचाऱ्यास दुखापत झाली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात तब्बल ३७ आआरोपींसह ८ ते १० अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ४७ जणाविरुध्द उदगीर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ, मुसानगर येथे काही व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली.दगडफेकीचे कारण समझू शकले नाही. या (Udgir Stone Pelting Case) दगडफेकीच्या  गोंधळात शासकीय जीपवर दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे वाहनाचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

तसेच, घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मार लागून तो जखमी झाला. सतीश भानुदास पवार (वय 40), पोलीस अंमलदार  यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आझम अस्लम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दूल रशीद शेख, आशा उर्फ अस्लम शेख, रोशन ताजोदीन शेख (बिलाल), मोहित जहागीरदार, जाकेर जहागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहील लाला शेख, मोईन हैदरमाव शेख, जुबेर मूसा शेख, इब्राहिम मूसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदूम मौलामाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ महमद रफी, सोहेल लाईक लददाफ, वजीर मोईदीन शेख, दस्तगीर मोईदीन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जहागीरदार, तोहिद मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालीया, मज्जू कडबेवाल, गौस हाकानी शेख, अयाज इस्माईल शेख (वाळूवाला), साहिल चांदपाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तीयाज, किशोर इश्वर मोतीराम, दिनेश धिरज कांबळे, सुमीत कांबळे यांच्यासह अन्य ८ ते १० जणांविरुद्ध  अशा एकूण ४७ जनावर . या प्रकरणात गुरनं-99/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(1), 125, 125(A), 189(2), 191(2)(3), 190, 324(3) तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 व सहकलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू ठेवला आहे.

खाकीचा वचक राहिला नाही: गुन्हेगारीचे वाढते प्रमाण 

उदगीर शहरात पोलीसाच्या खाकीचा वचक राहिला नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेच पण शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसाढवळया गुन्हेगार हातात धारधार शस्ञे घेवुन फिरताना दिसत आहेत.चोर्‍या,मारामार्‍या हे तर शहरात नेहमीचेच झाले आहे.पोलीसाच्या खाकीचा वचक राहिला नसल्यानेच या (Udgir Stone Pelting Case) घटना घडत आसल्याचे बोलले जात आहे.यासाठी पोलीस प्रशासनाने कायदयाची कडक अमलबजावणी केली तर शहरातील गून्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026