अवैध वाळू उपसा

परभणीत पिंप्री (झोला), नागठाणा गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा

Illegal sand mining: पिंप्री (झोला) येथे गंगाखेड पोलीस पथकाने गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करत असलेल्या तीन ट्रॅक्टर, एक जेसीबी आणि ४० ब्रासपेक्षा जास्त वाळू साठा जप्त केले.

परभणीत पिंप्री (झोला), नागठाणा गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा

Illegal sand mining

तीन ट्रॅक्टर, एक जेसीबी व वाळू साठा जप्त
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणी (Illegal sand mining) : गंगाखेड तालुक्यातील पिंप्री (झोला), नागठाणा शिवारातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपस्याविरुद्ध शनिवार ६ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तीन ट्रॅक्टर, एक जेसीबी व वाळू साठा जप्त करून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली अधिक अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार ६ जून रोजी पोउपनि चंदनसिंह परिहार, पोह महेश कवठाळे, पोह राहुल परसोडे, पोह माणिक वाघ, पोह रंगनाथ दुधाटे, पोह सचिन भदर्गे, पोशि शरद सावंत, पोशि दिलीप निलपत्रेवार, पोशि हनुमान ढगे, चालक पोह उत्तमराव हनवते आदींचे पथक अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त मंदिर परिसरात गस्तीवर असतांना पो. शि. भारत पवार, पोशि. पवन राऊत भेटले त्यावेळी पिंप्री (झोला), नागठाणा शिवारात गोदावरी नदीपात्रात जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिल्यावरून या पथकाने शनिवार ६ जून रोजी सकाळी १०:४५ वाजता पिंप्री (झोला), नागठाणा शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा मारला असता एमएच २९ बीसी ९४९७ क्रमांकाची एक जेसीबी मशीन तीन ट्रॅक्टरमध्ये (Illegal sand mining) वाळू भरतांना दिसून आली.

पोलीसांचे पथक गोदावरी नदी पात्रात येत असल्याचे पाहून या वाहनांच्या चालकांनी वाहने जागीच सोडून पळ काढला. पथकाने पाहणी केली असता नदी काठावर अंदाजे ४० ब्रास पेक्षा अधिक वाळू साठा केलेला दिसून आल्याने तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांना याची माहिती देत मंडळ अधिकारी चंद्रकांत साळवे यांच्या मार्फत वाळू साठ्याचा पंचनामा करून पिंप्री (झोला) येथील पोलीस पाटील यांच्या ताब्यात वाळू साठा देऊन वाळू भरलेले दोन ट्रॅक्टरसह एकूण तीन ट्रॅक्टर व जेसीबी मशीन असा एकूण ४० लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल गंगाखेड पोलीस ठाण्यात आणून पोह माणिक वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन ट्रॅक्टरचे चालक- मालक, जेसीबी चालक- मालक अशा एकुण आठ जणांविरुद्ध विनापरवाना बेकायदेशीररित्या शासनाच्या मालकीची वाळू कर बुडवून चोरटी अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध उत्खनन करून वाहतूक करीत चोरून नेण्याच्या कलमासह (Illegal sand mining) गौण खनिज अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत.

संबंधित सामग्री

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

Kanhan cattle Illegal transport: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला.

Sep 30, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

निलंगा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह ७०० ब्रास वाळू आणि ४५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Sep 22, 2026
हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

Giramwadi Gambling Raid: तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त

Sep 01, 2026
गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

Latur CJP Agitation: गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा देत सीजेपी आंदोलनासाठी वकिलांची फौज तयार आहे, अशी भूमिका एडवोकेट उदय गवारे यांनी एका पत्रकांन्वये

Aug 23, 2026