वॉटरपार्क तरुण मृत्यू

एक क्षणाचा आनंद…अन् आयुष्याचा अंत; वॉटर पार्कमध्ये 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Waterpark Youth Death: देऊळगाव राजा येथील वॉटर पार्कमध्ये 22 वर्षीय शुभम भास्कर सदावर्तेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एक क्षणाचा आनंद…अन् आयुष्याचा अंत; वॉटर पार्कमध्ये 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Waterpark Youth Death

वॉटर पार्कमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

देऊळगाव राजा (Waterpark Youth Death) : देऊळगाव राजा शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये आज दुपारच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. पाण्यात बुडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Waterpark Youth Death) मृत तरुणाचे नाव शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे असून, तो नाशिक येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. कौटुंबिक कार्यक्रमासाठी देऊळगाव राजा येथे आलेल्या शुभमने मित्रांसोबत वॉटर पार्कमध्ये जाण्याचा निर्णय घेतला; मात्र आनंदाचे क्षण काही क्षणातच दुर्दैवी ठरले.

माहितीनुसार, पाण्यात खेळताना (Waterpark Youth Death) शुभम खोल भागात गेला आणि बुडू लागला. मित्रांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याला बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर वॉटर पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनास्थळी प्रशिक्षित लाइफगार्ड होता का? आवश्यक सुरक्षा उपाययोजना का नव्हत्या? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

नातेवाईकांचा आक्रोश, कारवाईची मागणी

दरम्यान, शुभमच्या मृत्यूनंतर (Waterpark Youth Death) कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संतप्त नातेवाईकांनी वॉटर पार्क मालकावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केल्याशिवाय मृतदेहाचे पोस्टमार्टम होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे. सदर मृतदेह सध्या देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून, वृत्त लिहीपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. देऊळगाव राजा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला

Oct 06, 2026