पांढरकवडा (Yawatmal) :- शहरातील इंदिरा नगर मधिल १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणार्या आरोपी विरुध्द पोलीसांनी मुलीच्या आईच्या तक्रारी वरुन गुन्हे (Crime) दाखल केले आहे. सुरज वसंता परचाके २२ रा ताडउमरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लग्नाचे आमिष दाखवुन मुलीस पळवुन नेल्याची माहिती
फिर्यादीची मुलगी पांढरकवडा येथे मामाच्या घरी राहत होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेले. मुलगी घरुन बेपत्ता झाल्याने तिच्या मामाने तिचा सर्वत्र शोध घेतला. तिची आई यवतमाळच्या वडगांव परिसरात राहते. तिला सुध्दा मुलगी पळुन गेल्याची माहिती देण्यात आली. मुलीचा सर्वच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला असतांना तिला ताडउमरी येथील सुरज परचाकेने लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनला (police station) येवुन सुरजच्या विरुध्द तक्रार नोंदविली. पोलीसांनी मुलीच्या आईच्या फिर्यादी वरुन सुरज विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.