‘क्रांतिकारी’ने केला पोलखोल: मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल- सत्तार पटेल यांचा आरोप
लातूर (Crop Insurance) : अतिवृष्टी व पूर परिस्थितीने शेतकऱ्यांचे ‘वन टाइम’ पीक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ‘वन टाइम’ पीक विमा हप्ता भरला आहे. सोयाबीनचा हिशोब केला तर शंभर टक्के नुकसानी बद्दल शेतकऱ्यांना हेक्टरी 58 हजार रुपये मिळणे आवश्यक आहे. असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीक विमा हेक्टरी 17000 मिळेल, असे वक्तव्य करून शेतकऱ्याचे 41 हजार रुपये ढापण्याचे षडयंत्र सरकारचे आहे, असा पोलखोल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी केला.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र आक्षेप!
शेतकऱ्यांना अतिवृष्टी (Heavy Rain) व पूरपरिस्थितीची नुकसान भरपाई जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 80 टक्के नुकसान झाल्याने पीकविमा प्रतिहेक्टरी 17 हजार रुपये देण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला. याबाबत दैनिक ‘देशोन्नती’शी बोलताना सत्तार पटेल म्हणाले की, शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, तरीही मुख्यमंत्र्याच्या म्हणण्यानुसार 80 टक्के नुकसान झाले आहे. तरीही प्रतिहेक्टरी पीकविमा (Crop Insurance) 17000 रुपये कसा? असा सवाल सत्कार यांनी केला आहे. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे, हे यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.
निवडणुकीमध्ये आश्वासन देऊन सुद्धा निवडणूक झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाही!
निवडणुकीमध्ये (Election) आश्वासन देऊन सुद्धा निवडणूक झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त (Debt Free) केले नाही. 8500 रुपयांची मदत 18500 रुपये केली, पण ही मदत साधारण 80%ते 85% मिळणार म्हणजे 14800 ते 15725 इतकी मिळणार, ती सुद्धा दोन टप्प्यांमध्ये, असे पटेल म्हणाले.
नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीला प्रति गुंठा 470 रुपये प्रमाणे मिळणार. मनरेगामधून 350000 मिळणार म्हणजे हेही प्रतिगुंठा गुंठा 3500 रुपये याप्रमाणे मिळणार. मनरेगा ही योजना असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी किती कष्ट लागतात हे शेतकऱ्यांना माहित आहे, असा टोलाही सत्तार पटेल यांनी लगावला आहे.
37500 रुपयाला दुधाळ म्हैस आणून द्या!
मुद्दा पाचवा ज्यांची दुधाळ गुरे ढोरे वाहून गेलेत त्यांना 37500 रुपये मिळणार आज विचार करा दुधाळ म्हैस 37500 रुपयाला कोण्या बाजारात मिळते ती या महायुती सरकारने आणून द्यावी, असे आव्हानही सत्तार यांनी सरकारला (Government) दिले आहे. इतकी गंभीर परिस्थिती असताना सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही, असेही सत्तार पटेल यांनी म्हटले आहे.