Wardha :- यावर्षी खरीप हंगामात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अतिवृष्टी, सततच्या पावसाने शेतकर्यांचे कंबरडेच मोडले आहे. जिल्ह्यात दोन लाख १३ हजार हेक्टरवरील क्षेत्रात शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. एक लाख ९२ हजारांवर शेतकरी (farmer) यामध्ये बाधित झाले आहेत. अतिवृष्टी, रोगांच्या प्रादुर्भावाचा फटका पिकांना बसला असून ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.
एक लाख ९२ हजारांवर शेतकरी बाधित
खरीप हंगाम शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात शेतकर्यांनी सोयाबीन(soyabean), तूर, कपाशी आदी मुख्य पिकांची लागवड केली. चार पैसे मिळतील, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. पण, सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेत जमिनी खरडून निघाल्यात. विविध भागात अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे पिकांची मोठी हानी झाली. तसेच येलो मोजॅक, चारकोल रॉट आदी रोगांच्या प्रादुर्भावाने सोयाबीन गेले. सोयाबीनची सवंगणी करण्याचीही परिस्थिती राहिली नाही. या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून शेतकर्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १ लाख ४९ हजार ४९१ शेतकर्यांचे १ लाख ६७ हजार ४४०.३० हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये कापूस ७७८२८.३९ हेक्टर, तूर १२६६५.८०, सोयाबीन ७६७८२.४७ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याची माहिती आहे. येलो मोजॅक, चारकोल रॉटमुळे सोयाबीनचे अतोनात झाले आहे. येलो मोजॅक, चारकोल रॉटमुळे ४२ हजार ८३७ शेतकर्यांचे ४५ हजार ८८४ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दिवाळी तोंडावर असून नुकसानीने शेतकरी हवालदिले झाले आहेत. शेतकर्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत.