कळंब (Farmer Death) : स्थानिक नेहरु चौकातील केशकर्तनालय दुकानदार तथा शेतकरी रामदास गणपतराव देशकर वय ६५ वर्ष हे दि.६ जुन २०२५ चे सकाळी १० वाजताचे दरम्यान यवतमाळ रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगात निष्काळजीपणे बाभुळगांव वरुन कोठा रोडने कळंब कडे येत असलेल्या ट्रक क्रमांक एम एच ४२/ बीएफ ८१०९ च्या चालकाने मागील चाकात सायकलसह चिरडले.
कळंब शहरातील नेहरु चौकामधिल केशकर्तनालय दुकान चालवून शेती करीत असलेला शेतकरी रामदास गणपत देशकर नेहमी प्रमाणे सध्या खरीप हंगामाची कामे सुरु असल्याने सायकलने सकाळी कोठा रोडवरील शेतात जाऊन १० वाजताचे दरम्यान घराकडे परत येत होता तर त्याचे मागुन नगरपरीषदेचा घनकचरा भरुन बाभुळगांव, कळंब मार्गे घुग्गुस प्लँटटेशनवर जात असता भरधाव वेगात निष्काळजीपणे ट्रक चालक आकाश नानासाहेब कदम वय २३ वर्ष रा.राक्षस भवन जिल्हा बिड याने (Farmer Death) भरधाव वेगात येऊन सायकलस्वार रामदासला मागील चाकात चिरडत नेले व जागीच त्याचा चेहरा मोहरा केला.
सदर घटनेची शहरात माहिती पसरताच अघातस्थळी पोलीस कर्मचार्यांसह शहरातील नागरीकांची गर्दी उसळली होती. (Farmer Death) पोलीसांनी लगेच ट्रक पोलीस स्टेशनला जमा करुन रोडवर पडलेला रामदासचा मृतदेहाचा गोळा कळंब ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन रीपोर्ट तयार करुन नातेवाईकांसह शहरवासियांच्या उपस्थितीत कुबडाईपुरा मोक्षधामावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकचे मागे पत्नी,२ मुले,१ मुलगी,जावयी, सुन असा परीवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बारस्कर करीत आहे.