मुंगळा (Samriddhi Highway) : मुंगळा येथील समृद्धी महामार्ग मुळे शेतकऱ्यांची पिकाचे नुकसान होत आहे .गेल्या 3 वर्षापासून मुंगळा कळमेश्वर रोडवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ असलेल्या संपूर्ण शेतकरी वर्गाच्या सोयाबीन पिकातून (Samriddhi Highway) समृद्धी महामार्गाचे पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे शेती खरडून जात आहे याकडे प्रशासकीय यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष होत आहे व संबंधित ठेकेदार सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे.
ठेकेदार ने जेसीबी ने खणून घेऊन शेतात जायचे रस्ते बंद करून टाकले आहेत .खणून ठेवलेल्या पाटामुळे पाट फुटून गट क्रमांक 223 व 224 या शेतात अक्षरशः नाला पडून शेती खरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे . त्या संबंधी तहसीलदार यांना आमदार अमित झनक यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले होते. कलेक्टर व मुख्यमंत्री यांस 3 वर्षा पासून ईमेल द्वारे तक्रार देण्यात येत आहेत. तीन वर्षांपूर्वी नायब तहसीलदार वानखेडे साहेब यांनी ठेकदारास सर्विस रोड बद्दल काम चालू करून शेतात शिरणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या होत्या.
अद्याप ही सर्विस रोड बनवण्यात आला नाही. Msrdc अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यास तुमच्या शेती नजीक गॅस पाइपलाइन गेली आहे त्या मुळे आम्ही काम करू शकत नाही अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. सर्व्हिस रोड मंजूरी असून सुद्धा अद्याप रोड का करण्यात आला नाही ? शेती समोरील गॅस पाइपलाइन अधिकृत आहे की अनधिकृत ? वारंवार तक्रार देऊन सुद्धा प्रशासनाने या बाबीकडे शेतकऱ्यांच्या समस्यां कडे लक्ष न देत नेमके कोणाला पाठीशी घालत आहे.
नुकसानीचे ना पंचनामे झाले ना संबंधित ठेकेदारावर हलगर्जी पण केला म्हणुन कारवाई. अश्या असंख्य प्रश्नाची उत्तरे शेतकरी वर्ग मागत आहे. ढिम्म प्रशासनाचा कारभार , व वरून अस्मानी संकट अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. (Samriddhi Highway) समृद्धी महामार्गाचे अपूर्ण काम, ठेकेदाराचा हलगर्जीपणा या मुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गामध्ये होत आहे.