चिमुर (Chandrapur) :- चिमूर तालुक्यातील वनविकास महामंडळ अंतर्गत खडसंगी वनपरिक्षेत्रातील महालगाव बीटात दि. १९ मे २०२५ सोमवार ला कक्ष क्रमांक २१ उरकुडपार तलावाच्या जवळ एका नर वाघाने मादी पिल्लाला अंदाजे वय ६ महिने हल्ला (Attack) करून ठार केल्याबाबत सुचना मिळाली सदर घटना अंदाजे सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यानची आहे. मौकास्थळी एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, खडसंगी एफडीसीएमचे वन परिक्षेत्र अधिकारी (forest range officer) ए. के. सोनुरकर तसेच चिमूर प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
वाघाचे शावक अनेक जखमांमुळे मरण पावले
सदर घटनेचा पंचनामा नोंदवून रात्री पिल्ल्याचे शवविच्छेदन करण्याकरीता टी.टी.सी. चंद्रपूर येथे नेण्यात आले मृतदेहाला (Dead Body)सर्व नखे, चट्टे ३ आणि ४ था ग्रीवाच्या मणक्यांची, तिसरी डावी बरगडी तसेच ५ वी आणि ६ वी उजवी बरगडी गंभीर रक्तस्त्रावाने फॅक्चर (Facture) झाली आहे. सांगितलेल्या वाघाचे शावक (tiger cub)अनेक जखमांमुळे मरण पावले आहे. कशेरुकाचा डिएनए (DNA) विश्लेषणासाठी गोळा करण्यात आला होता. तसेच हिस्टोपॅथच्या (histopath) तपासणीसाठी नमुने गोळा करण्यात आले होते. यावेळी शवविच्छेदन डॉ. रविकांत एस. खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (wildlife) आणि प्रमुख, जलद बचाव पथक, टीएटीआर डॉ. कुंदन पोडचावार, पशुवैद्यकीय अधिकारी, टीटीसी, चंद्रपूर डॉ . पी डी कडुकर निवृत्त एलडीओ विनम्र गणेश मोटकर विभागीय व्यवस्थापक चंद्रपूर वन प्रामुख्याने उपस्थित होते.