पातूर (Patur wet drought ) : तालुक्यात संततधार पावसाने शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला असून, पिके वाया गेल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक गेले आणि शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी तातडीने पातूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची झालेली दैना आणि सणासुदीचे दिवस (दिवाळी) पाहता, ही मदत तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांचे सण-उत्सव सुकर करावेत, अशी जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या (Patur wet drought) मागणीसाठी मा. प. स. सदस्य गोपाल ढोरे यांच्यासह अनेक शेतकरी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसीलदार पातूर यांना निवेदन सादर करण्यासाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केलेल्या या मागणीमुळे आता शासन यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.