आरोग्य मंत्रालयाची घोषणा!
नवी दिल्ली (Deepika Padukone) : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोणची भारताची पहिली ‘मानसिक आरोग्य राजदूत’ म्हणून नियुक्ती केली आहे. समाजात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि तो एक महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य मुद्दा बनवण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जाते.
On the occasion of World Mental Health Day 2025, Union Health Minister Shri @JPNadda Launches New Initiatives for the Tele MANAS App
Launches enhanced Tele MANAS App featuring Multi-lingual UI for enhanced accessibility, Chatbot feature for users to engage with… pic.twitter.com/Hg31PLW9AG
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 10, 2025
मानसिक आरोग्यासाठी सामाजिक मान्यता मिळविण्यात हा उपक्रम महत्त्वाचा!
यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री श्री.पी. नड्डा म्हणाले, ‘दीपिका पदुकोणसोबतची ही भागीदारी भारतातील मानसिक आरोग्याबद्दल सार्वजनिक चर्चा वाढवेल आणि लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यास मदत करेल. मानसिक आरोग्यासाठी सामाजिक मान्यता मिळविण्यात हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.’
View this post on Instagram
सरकारकडून नवीन उपक्रम!
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (World Mental Health Day), केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी देशभरातील नागरिकांसाठी एक प्रमुख उपक्रम सुरू केला. राजधानी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी सुधारित ‘टेली-मानस’ अॅप लाँच केले. हे अॅप मानसिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश वाढविण्यासाठी आणि संकटाच्या काळात मदत करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
दीपिका पदुकोण काय म्हणाली?
भारत सरकारच्या या उपक्रमाबद्दल बोलताना दीपिकाने या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली, ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयासाठी (Union Ministry of Health) पहिली मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्ती होणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले आहे. मी या दिशेने मंत्रालयासोबत काम करण्यास आणि देशाची मानसिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यास पूर्णपणे तयार आहे.’
दीपिका पदुकोण कामाच्या आघाडीवर!
सध्या, दीपिका तिच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ती या चित्रपटात अनेक वर्षांनी शाहरुख खानसोबत दिसणार आहे. याशिवाय, दीपिका पदुकोण ॲटली दिग्दर्शित तेलुगू चित्रपट AA22xA6 मध्ये देखील दिसणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन तिच्यासोबत मुख्य भूमिकेत असेल.