तुमसर-भंडारा महामार्गावरील खरबी येथील घटना
तुमसर (Deer Accidental Death) : तुमसर-भंडारा महामार्गावरील तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खरबी शेतशिवारात ३० मे रोजी दुपारच्या दरम्यान अज्ञात वाहनाने हरीणाला धडक दिल्याने जागिच ठार झाल्याची घटना समोर आली आहे.
तुमसर-भंडारा मार्गावरील खरबी शिवारात अन्नपाण्याच्या शोधात हरीण आणि काळवीट यांच्यासह अन्य वन्यप्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. या महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणारी वाहने अनेकदा प्राण्यांचा जीव घेतल्याची उदाहरणे आहेत. त्यात काही दिवसापूर्वी (Deer Accidental Death) काळवीट ठार झाल्याची घटना घडली होती. परंतु वनविभागाच्या कडक कायद्याच्या धाकात सुध्दा वाहनचालक मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न अजिबात करीत नसल्याचे उदाहरण समोर येत आहेत. त्यात अनेक वन्यप्राण्यांच्या जीव गेल्याची अनेक उदाहरणे ऐकण्यास मिळाली आहे.
दरम्यान ३० मे रोजी दुपारच्या दरम्यान चारा पाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडत गावाकडे मार्गक्रमण करणार्या हरीणाला रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने खरबी जवळ जबर धडक दिली. त्यात (Deer Accidental Death) हरीण गंभीर जखमी होऊन जागिच ठार झाली. सदर घटनेची माहिती तुमसर वनपरिक्षेत्र क्षेत्र कार्यालयाला देण्यात आली.
दरम्यान वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचली भटक्या व हिंस्र, श्वानापासुन अथवा वाहनापासुन मृत हरीणाला धोका पुन्हा पोहचु नये म्हणून वनरक्षक चंद्रशेखर सार्वे, वन्यप्रेमी अभय गिरीपुंजे, आशिष गोमासे, नवीन सिंगणजुडे, अशोक गौपाले, सुमित भोपे, रणजीत मांढरे, सौरभ गोपाले, पवन गाढवे आदी वन्यप्रेमींनी हरीणाला महामार्गावरुन बाजूला करुन घटनास्थळी वन्यप्रेमी तळ ठोकुन होते. मृत हरीणाला वनरक्षक चंद्रशेखर सार्वे व वन्यप्रेमी यांच्या उपस्थितीत जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.




 
			 
		

