नवी दिल्ली (Delhi Weather) : आता कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे. दिल्लीत पाऊस आणि (Weather Report) धुळीचे वादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिल्लीत दोन दिवसांसाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्लीत अंशतः ढगाळ आकाश, मेघगर्जनेसह वादळ किंवा धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. दिल्लीत ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि खूप हलका पाऊस पडणार आहे.
हवामान संबंधित मोठी अपडेट
IMD नुसार बुरारी, बदली, मॉडेल टाऊन, आझादपूर, पितामपुरा, दिल्ली विद्यापीठ, सिव्हिल लाईन्स आणि पंजाबी बाग या (Weather Report) भागात पावसाची शक्यता आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिल्लीच्या हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. IMD नुसार दिल्लीत 6 जून रोजी धुळीचे वादळ (Weather Report) येणार असून, कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस राहील. आज किमान तापमान 31 अंश सेल्सिअस असून, गुरुवारी ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्यानुसार मेघगर्जना, विजांचा कडकडाट
हवामान खात्यानुसार विविध ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि धुळीचे वादळ होण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. IMDने सांगितले की, दिल्लीत 9 जूनपर्यंत पाऊस पडू शकतो. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दिल्लीत दाखल होऊ शकतो. या (Weather Report) आठवड्याच्या उर्वरित भागात, दिवसा काही वेळा जोरदार वाऱ्यासह आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.