रिसोड (Power supply) : कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता दूध डेअरीचा वीज पुरवठा खंडीत केल्या मुळे झालेल्या नुकसानाची आर्थिक भरपाई देण्याची मागणी जीवन मिल्क अँड फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचा वतीने २४ एप्रिल रोजी (Power supply) वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, रिसोड शहरा लगत करडा रोड वर जीवन मिल्क अॅण्ड फुड प्रोडक्टस प्रा.ली. रिसोड या नावाने दुध डेअरीचा उद्योग असून त्या जागी आपल्या ११ के.व्ही.टाऊन एक फिडर वरून दोनशे के.व्ही चे ट्रान्सफार्मर असून २३ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता आमच्या फॅक्ट्री समोरच ११ के.व्हीचे कंडेक्टर तुटले असता महावितरणचा कर्मचाऱ्यांनी तातडीने जोडले नाही.
या उलट त्यांनी आमच्या फक्ट्री मध्ये येणारा (Power supply) विद्युत पुरवठा खंडीत केला व ११ के. व्ही टाऊन एक वरून फिडर सुरु केले. या विषयाची त्यांनी मला कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना सुध्दा दिली नाही. याच कारणामुळे तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या हलगर्जी पणामुळे माझे ७८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तद्वतच दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता माझ्या फॅक्ट्रीचा (Power supply) विद्युत पुरवठा सुरु करण्यात आल. माझा दुध डेअरीचा व्यवसाय असून सध्या उष्णता खुप मोठ्या प्रमाणात आहे.फॅक्टरी मधील अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे फॅक्टरी मधील दुध व दुग्ध जन्य पदार्थ खराब झाले.यात आमचे फार मोठे आर्थीक नुकसान झाले असुन याचा आम्हास मानसिक त्रास सुद्धा झाला आहे.
आमची फॅक्टरी आपल्या कंपनीची रिसोड शहरातील दोन नंबरचा मोठा ग्राहक असुन आता पर्यंत लाखों रुपयांचे वीज देयक आम्ही भरले आहे. झालेल्या नुकसानला (Power supply) वीज वितरण कंपनी व कंपनीचे संबंधीत अधिकारी कर्मचारी दोषी आहेत. आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई वीज वितरण कंपनीने त्वरीत द्यावी. अन्यथा आम्हाला कायदेशीर पाऊल उचलावे लागेल. असा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.