Gadchiroli :- महाराष्ट्र शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000/- बोनस देण्याचे घोषीत केले. परंतु घोषणा करूनही अजुनही कोरची तालुक्यातील कोगुल, बोरी व गैरापत्ती येथील धान खरेदी केन्द्रावर ऑनलाइन व विक्री केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झाली नाही.
तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
सध्या शेतक-याचे रोवणीचे दिवस असुन शेतक-यांना पैश्याची अत्यन्त आवश्यकता असून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना बोनसची रक्कम शेतक-यांच्या खात्यात आठ दिवसाच्या आत जमा करावी अन्यथा कोरची तालुका काँग्रेसच्या (Congress) वतीने 31 जुलै ला दुपारी 12 वाजता झनकारगोन्दी फाट्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्ष कोरची तर्फे निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना काँग्रेस पक्ष कोरचीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद (Zilla Parishad) उपाध्यक्ष रामसूराम काटेंगे, माजी सभापती श्रावण मातलाम, नगरसेवक धनराज मडावी, दीपक हलामी, रवी नंदेश्वर, दानशूर हलामी आदी उपस्थित होते.