देवासमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ ठार, अनेक जखमी

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील टोंक कला परिसरातील फटाक्यांच्या कारखान्यात गुरुवारी (१४ मे) सकाळी सुमारे ११.३० वाजता भीषण स्फोट होऊन त्यानंतर मोठी आग लागली.

देवासमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ ठार, अनेक जखमी

Dewas Factory Blast

देवास (Dewas Factory Blast) : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील टोंक कला परिसरातील फटाक्यांच्या कारखान्यात गुरुवारी (१४ मे) सकाळी सुमारे ११.३० वाजता भीषण स्फोट होऊन त्यानंतर मोठी आग लागली. या दुर्घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्फोट इतका भीषण होता की काहींचे अवयव २० ते २५ फूट अंतरावर विखुरले गेल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात सुमारे २०० महिला काम करत होत्या, अशीही माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची दखल घेत जिल्ह्याचे प्रभारी मंत्री व उपमुख्यमंत्री जगदीश देवडा , गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री मोहन् यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. “बाबा महाकाल यांच्या चरणी दिवंगत आत्म्यांना शांती लाभो, दुःखी कुटुंबियांना धैर्य मिळो आणि जखमींना लवकर बरे होण्याची शक्ती मिळो,” अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी कारखान्याबाहेर गर्दी केली. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अधिकृत चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

विषारी दारूने घेतले 11 बळी;  सागर प्रकरणात 4 अधिकाऱ्यांवर कारवाई

विषारी दारूने घेतले 11 बळी; सागर प्रकरणात 4 अधिकाऱ्यांवर कारवाई

Sagar toxic liquor case: बंडा तहसील परिसरात विषारी दारू प्यायल्याने तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कठोर भूमिका घेतली

Sep 07, 2026
३,४०० लिपस्टिकचे Kiss Marks असलेली कार रस्त्यावर धावताच पोलिसांची कारवाई; चालकाला ५,५०० रुपयांचा दंड

३,४०० लिपस्टिकचे Kiss Marks असलेली कार रस्त्यावर धावताच पोलिसांची कारवाई; चालकाला ५,५०० रुपयांचा दंड

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला अनोखा प्रयोग मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका कारचालकाला चांगलाच महागात पडला.

Aug 25, 2026
कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात!

कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात!

 कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

May 18, 2026
खापरखेडा मध्ये रुग्णाला औषध पोहोचवून परतणाऱ्या तरुण फार्मसी चालकाचा अपघातात मृत्यू

खापरखेडा मध्ये रुग्णाला औषध पोहोचवून परतणाऱ्या तरुण फार्मसी चालकाचा अपघातात मृत्यू

रुग्णाला तातडीने औषध पोहोचवून नागपूरहून परतत असताना दहेगाव रंगारीजवळ झालेल्या भीषण अपघातात वलनी वस्ती (ता. सावनेर) येथील निखिल संजय चकोले (वय 29) या तरुण फार्मसी चालकाचा मृत्यू झाला.

May 18, 2026
विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय हालचालींना वेग

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय हालचालींना वेग

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर होताच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे.

May 18, 2026