कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात!

 कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात!

Karanja Fire

कारंजा घाडगे (Karanja Fire) : कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आगीचे वृत्त समजताच परिसरात एकच धावपळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महावितरण कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत अचानक आग भडकली. आगीची तीव्रता भीषण असून, महावितरणचे कर्मचारी आपल्या स्तरावर उपलब्ध साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

अग्निशमन विभागाचा हलगर्जीपणा; सोलर प्लांट धोक्यात
धक्कादायक बाब म्हणजे आग लागून बराच वेळ झाला तरीही अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकला नाही. अग्निशमन दलाच्या या विलंबाचा फटका आता बसताना दिसत आहे. आग अधिकच पसरत चालली असून, महावितरण कार्यालयाच्या समोरच असलेल्या सोलर प्लांट (सौर ऊर्जा प्रकल्प) पर्यंत या आगीच्या ज्वाळा पोहोचल्या आहेत.

सोलर प्लांटला आगीने वेढल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन बंब तात्काळ न पोहोचल्याने स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026