कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्राचा निर्णय; मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिली अशी घटना
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर-मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला होता.
Union Education Minister Dharmendra Pradhan resigns.
— ANI (@ANI) July 25, 2026
"...To ensure that anti-national elements are not benefitted by the situation at Jantar Mantar and across the country, that the nation remains united, students in India do not get tangled in legal complexities and focus on… https://t.co/sbtiMMhrgp pic.twitter.com/DPdZwn8q7i
दरम्यान, दिल्लीपुरते मर्यादित राहिलेले हे आंदोलन हळूहळू देशातील विविध राज्यांमध्ये पोहोचले. मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटीसह अनेक भागांत आंदोलनाची व्याप्ती वाढली. त्यामुळे केंद्र सरकारविरोधातील असंतोष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र निर्माण झाले.
आंदोलनाचा वाढता प्रभाव आणि देशभरातील विस्तार लक्षात घेऊन केंद्र सरकारने अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.